Punjab Flood 2025 : पंजाब राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तब्बल 1.25 लाखांहून अधिक नागरिक पूरग्रस्त झाले असून, अनेक गावं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत.
स्थानिक स्वयंसेवक, NGO संघटना आणि SDRF टीमने मिळून मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू केलं आहे. लोकांना बोटींनी सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. काही ठिकाणी तर लोकं घरांच्या टेरेसवर अडकलेले असून, अन्न व पिण्याच्या पाण्याचा मोठा तुटवडा आहे.
VIDEO | Ferozepur: Punjab CM Bhagwant Mann (@BhagwantMann) turns emotional while meeting flood-affected families.#PunjabFloods
— Press Trust of India (@PTI_News) September 2, 2025
(Source: Third Party) pic.twitter.com/mAOkxScGxq
मोहाली, रोपड, लुधियाना, आणि होशियारपूर या जिल्ह्यांत सर्वाधिक गंभीर स्थिती असून अनेक रस्ते बंद झाले आहेत. अनेक शेतजमिनीही पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे.
Flood visuals from Punjab, India ! pic.twitter.com/EC3ogNmGYx
— Brand Leakage (@Brandleakage) September 2, 2025
व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये दिसतंय की लोक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांना वाचवत आहेत. काही युवकांनी बोटीतून वयोवृद्ध आणि मुलांना बाहेर काढताना दाखवलं आहे.
Punjab on Red Alert as Ravi-Sutlej and Chenab Rivers Face Extreme Flood Threat
— The Truth International (@ttimagazine) September 2, 2025
FOR MORE DETAILS: https://t.co/OaV2x3kSNn#LatestUpdates #Punjab #RedAlert #RaviSutlejChenabRivers #Face #Extreme #Flood #Threat #Lahore #TTI pic.twitter.com/BPOHjzCk9s
राज्य सरकारने युद्धपातळीवर आपत्ती व्यवस्थापन सुरू केलं असून, केंद्र सरकारनेही NDRF टीम पाठवण्याचे आदेश दिले आहेत. ही परिस्थिती पाहता पुढील 48 तास अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत, असं हवामान विभागानंही सांगितलं आहे. अजूनही पावसाची शक्यता असल्याने प्रशासन अधिक सतर्क झालं आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!