Rajat Patidar SIM Card Scam : भारतीय क्रिकेट विश्वात गेल्या दोन दिवसांत एक अनोखी घटना चर्चेत आहे. भारतीय क्रिकेटपटू रजत पाटीदार याच्या सिम कार्डमुळे असा प्रकार घडला की जे ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. घडले असे की, रजत पाटीदारचा एक जुना मोबाईल नंबर, जो त्याच्या दुसऱ्या सिमवर चालत होता, मोबाईल कंपनीने बंद करून छत्तीसगडच्या एका तरुणाला अलॉट केला. योगायोग असा की, त्या नंबरवरून विराट कोहली, एबी डिविलियर्स आणि इतर नामांकित क्रिकेटर्सचे कॉल्स यायला लागले. हा तरुण सुरुवातीला चकित झाला, पण नंतर त्याला कळले की हा नंबर पूर्वी रजत पाटीदार वापरत होता.
जेव्हा पाटीदारला या प्रकाराची माहिती मिळाली, तेव्हा त्याने तात्काळ पोलिसात तक्रार केली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर प्रकरण मिटले, मात्र यामधून एक महत्वाचा धडा मिळतो, तुमची सिम कार्डसुद्धा अशाच प्रकारे दुसऱ्याला दिली जाऊ शकते!
A guy from Chhattisgarh purchased a new sim which turned out to be Rajat Patidar's old number.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 10, 2025
– He received calls from Virat Kohli and AB De Villiers, but after Patidar informed the Police, the man returned the sim. pic.twitter.com/Hqrl2fcek5
दुसरे सिम आणि धोका
आजकाल अनेकजण दोन सिम वापरतात, एक प्रायव्हेट आणि दुसरे ऑफिससाठी किंवा ऑफर्सच्या मोहात घेऊन. मात्र, दुसरे सिम वापरण्यात आपण फारसा रस दाखवत नाही. महिनोन्महिने रिचार्ज न केलेली सिम बंद होऊन कंपनी दुसऱ्याला देऊ शकते. अशावेळी तुमचे प्रायव्हेट कॉल्स, मेसेजेस किंवा WhatsApp OTP दुसऱ्याच्या हाती लागू शकतात.
कोणत्या कंपनीची सिम किती दिवस टिकते?
- Jio – रिचार्ज न करता साधारण 90 दिवस सक्रिय
- Airtel – साधारण 90 दिवस + 15 दिवस ग्रेस पीरियड
- Vodafone Idea (Vi) – साधारण 90 दिवस
- BSNL – रिचार्ज न करता तब्बल 180 दिवस सक्रिय
काय करावे?
जर तुमचे दुसरे सिम वापरात नसेल, तरी ते काही महिन्यांनी किमान सर्वात लहान रिचार्ज प्लॅनने रिचार्ज करत राहा. यामुळे नंबर बंद होणार नाही आणि तुमची प्रायव्हसी सुरक्षित राहील. रजत पाटीदार यांच्या घटनेने हे स्पष्ट केले आहे की, थोडासा दुर्लक्षपणाही मोठा त्रास देऊ शकते. म्हणूनच, आपल्या सिम कार्डांची वेळेवर काळजी घ्या, नाहीतर तुमच्याही नंबरवरून कोहलीचा कॉल कुणा दुसऱ्याला जाऊ शकतो!
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!