

Raju Srivastava’s Cricket Commentary : आपल्या खास स्टाइलनं लाखो लोकांना हसवल्यानंतर राजू श्रीवास्तवनं जगाचा निरोप घेतला. सोशल मीडिया, यूट्यूबवर त्याचे अनेक कॉमेडीचे व्हिडिओ खूप लोकप्रिय झाले आहेत. चाहत्यांना राजूचं लोकप्रिय पात्र गजोधर खूप आवडलं होतं. यासोबतच तो अनेक राजकारणी आणि अभिनेत्यांची उत्तम मिमिक्रीही करत असे. लालू प्रसाद यादव आणि दिलीप कुमार यांची मिमिक्री चाहत्यांना खूप आवडाची. राजूनं आपल्या विनोदी शैलीत अनेकवेळा क्रिकेट कॉमेंट्रीची मजाही चाहत्यांना दिली आहे. दिलीप कुमार यांच्या शैलीतील त्यांची क्रिकेट कॉमेंट्री खूप लोकप्रिय आहे.
राजू श्रीवास्तव यानं त्याच्या एका कार्यक्रमात दिलीप कुमार यांच्या शैलीत कॉमेंट्री केली होती. दिलीप कुमार यांची बोलण्याची शैली खूप वेगळी आणि खास होती. या खास शैलीत त्यान क्रिकेटवर कॉमेंट्री केली.
हेही वाचा – मुंबईत रिक्षा चालवताना ‘ब्रेक’ मिळाला आणि राजू श्रीवास्तव पुढं कॉमेडी किंग ठरला!
राजू श्रीवास्तवचा भाऊ दीपू श्रीवास्तव यांनी पीटीआयला सांगितलं, ”सुमारे अर्ध्या तासापूर्वी, कुटुंबातील सदस्यांनी मला फोन करून त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्याला ४० दिवसांपेक्षा जास्त काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातील अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १०.२० वाजता राजू श्रीवास्तव यांना मृत घोषित करण्यात आलं.”
१० ऑगस्ट रोजी दिल्लीतील एका हॉटेलच्या जिममध्ये व्यायाम करत असताना राजूला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले, जिथं त्याची ‘अँजिओप्लास्टी’ करण्यात आली. तेव्हापासून तो व्हेंटिलेटरवर होता.