

Rakesh Jhunjhunwala Death : शेअर बाजाराचा ‘बादशाह’ म्हटले जाणारे राकेश झुनझुनवाला आता या जगात नाहीत. आज रविवारी सकाळी ६.४५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राकेश झुनझुनवाला यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी येथे उपचार सुरू होते. येथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. झुनझुनवाला यांनी नुकतीच ‘अकासा एअर’ नावाची विमानसेवा सुरू केली. त्यांनी उद्योगपती आदित्य घोष आणि विनय दुबे यांच्यासोबत ही’ एअरलाईन्स सुरू केली होती.
राकेश झुनझुनवालाचं कुटुंब
झुनझुनवाला यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले आहेत. त्यापैकी एक त्यांची मुलगी आणि दोन मुले आहेत. झुनझुनवाला यांच्या पत्नीचं नाव रेखा झुनझुनवाला, मुलगी निस्था झुनझुनवाला, मुलगा आर्यमन झुनझुनवाला, दुसरा मुलगा आर्यवीर झुनझुनवाला आहे. राकेश झुनझुनवाला यांचा जन्म १९६० साली झाला. त्याच्या शिक्षणाबद्दल बोलायचे तर ते चार्टर्ड अकाउंटंट होते. त्यांनी केवळ ५००० रुपयांपासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि सध्या त्यांची एकूण संपत्ती ४३ हजार कोटी रुपये आहे.
Billionaire veteran investor and Akasa Air founder Rakesh Jhunjhunwala passes away at the age of 62 in Mumbai pic.twitter.com/36QcRfHXsa
— ANI (@ANI) August 14, 2022
Rakesh Jhunjhunwala was indomitable. Full of life, witty and insightful, he leaves behind an indelible contribution to the financial world. He was also very passionate about India’s progress. His passing away is saddening. My condolences to his family and admirers. Om Shanti. pic.twitter.com/DR2uIiiUb7
— Narendra Modi (@narendramodi) August 14, 2022
हेही वाचा – बातमीच आहे ‘भारी’..! भारतीय शास्त्रज्ञांनी खाऱ्या पाण्यावर चालणारा LED कंदील तयार केलाय!
पहिल्यांदाच विकत घेतलेले शेअर्स..
बिग बुल म्हटल्या जाणार्या राकेश झुनझुनवाला यांची कहाणी मोठा धडा शिकवणार आहे. अवघ्या ५००० रुपयांच्या गुंतवणुकीनं त्यांनी सुरुवात केली. त्यांनी प्रथम टाटा टीचे ५००० शेअर्स खरेदी केले. खरेदीच्या तीन महिन्यांनंतर त्यांनी १४३ रुपयांना प्रत्येकी शेअर विकला, जो त्यांनी अवघ्या ४३ रुपयांना एक शेअर खरेदी केला होता. त्यांनी २००२-२००३ मध्ये टायटन कंपनी लिमिटेडचे शेअर्स सरासरी ३ रुपये किमतीला खरेदी केले, ज्याची सध्या किंमत २१४० रुपये आहे. त्यांच्याकडे टायटनचे ४.४ बिलियनपेक्षा जास्त शेअर्स आहेत. याशिवाय झुनझुनवाला यांनी ‘इंग्लिश-विंग्लिश’, ‘शमिताभ’ आणि ‘की अँड का’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे.
End of an Era as the Big Bull of the Dalal Street , #RakeshJhunjhunwala passes away.
Condolences to his family and loved ones. Om Shanti 🙏 pic.twitter.com/3OrVSzU2Ty— Virender Sehwag (@virendersehwag) August 14, 2022
हेही वाचा – कैदी नंबर ८९५९..! संजय राऊतांचं जेलमध्ये कसं चाललंय? कोण येतं भेटायला? इथं वाचा!
या कंपन्यांमध्ये झुनझुनवालांची गुंतवणूक
झुनझुनवाला यांनी अशा अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांनी टायटन यांसारख्या कंपन्यांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली असून त्याखालोखाल स्टार हेल्थ, मेट्रो ब्रँड, टाटा मोटर्स, क्रिसिल यांचा क्रमांक लागतो. टायटनमध्ये गुंतवणूक केल्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी केवळ एका दिवसात ९०० कोटी रुपये कमावले. लोक तुमची स्तुती करत असताना तुम्ही सावध राहा, असे झुनझुनवाला म्हणायचे. कारण सर्वात मोठ्या चुका तेव्हाच होतात जेव्हा तुमचा वेळ चांगला असतो.