

उलटा धबधबा..
जगात अशी अनेक रहस्यमय ठिकाणं आहेत, ज्यांचा शोध आजपर्यंत मानवाला लागलेला नाही आणि ज्यांचा शोध लागला आहे, त्यांची रहस्यं माणसाला नेहमीच गुंतवून ठेवतात. भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत, जी लोकांच्या कुतुहलाचा विषय आहेत. महाराष्ट्रातील नाणेघाटाचा उलटा धबधबा हे देखील असेच एक रहस्यमय ठिकाण मानलं जातं. नाणेघाट पुण्यातील जुन्नरजवळ महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात आहे. हे ठिकाण मुंबईपासून तीन तासांच्या अंतरावर आहे. उलटा धबधब्यासाठी हा घाट जगभर प्रसिद्ध आहे. त्याचं सौंदर्य विशेषतः पावसाळ्यात पाहण्यासारखं असतं. उलटा धबधबा पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येनं गर्दी करतात.
When the magnitude of wind speed is equal & opposite to the force of gravity. The water fall at its best during that stage in Naneghat of western ghats range.
Beauty of Monsoons. pic.twitter.com/lkMfR9uS3R— Susanta Nanda (@susantananda3) July 10, 2022
पाणी हवेत कसं जातं?
न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार, वरून पडणारी कोणतीही गोष्ट सरळ खाली येते. धबधब्यांचंही असंच आहे. पण जेव्हा वाऱ्याच्या वेगाची तीव्रता गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बरोबर आणि विरुद्ध असते, तेव्हा या नाणेघाटाच्या धबधब्याचं पाणी उलटं हवेत जातं. ही नक्कीच धक्कादायक घटना आहे, परंतु दृश्य पाहिल्यानंतर तुमचं मन खूप आनंदी होईल. हे ठिकाण पुण्याच्या उत्तरेस सुमारे १२० किमी आणि मुंबईच्या पूर्वेस सुमारे १६५ किमी अंतरावर आहे.
तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल त्यासाठीही नाणेघाट हे तुमच्यासाठी उत्तम ठिकाण आहे. नाणेघाट ट्रॅक हा घाटघर जंगलाचा एक भाग आहे, या ठिकाणी कल्याण-अहमदनगर महामार्ग आणि कल्याण येथून ट्रेकर्सनाही पोहोचता येते. हा ४ ते ५ किमी लांबीचा ट्रॅक दोन्ही बाजूंनी ओलांडण्यासाठी ५ तास लागू शकतात. डोंगराच्या माथ्यावर वाहनांनीही जाता येते. त्यासाठी पर्यायी मार्गही तयार करण्यात आला आहे. मात्र, पावसाळ्यात इथलं दर्शन घेणं चांगलं मानलं जातं. कारण उलटा धबधब्याची ही विचित्र घटना यावेळी पाहायला मिळते, कारण यावेळी वारे खूप वेगानं वाहतात.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!