

Saurabh Rajput Murder Case : उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले आहे. शहरातील सौरभ राजपूत नावाच्या व्यक्तीची त्याच्या पत्नीने तिच्या प्रियकरासह हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. २९ वर्षीय सौरभ राजपूत लंडनमध्ये काम करत होता आणि गेल्या महिन्यातच परतला होता. सौरभच्या कुटुंबाने मेरठ पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा या गुन्ह्याबद्दल धक्कादायक माहिती समोर येऊ लागली.
मेरठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय मुस्कान रस्तोगीने तिचा प्रियकर साहिल शुक्लासोबत मिळून ३ मार्चच्या रात्री तिचा पती सौरभ राजपूतची हत्या केली. पत्रकार परिषदेत पोलिसांनी सांगितले की, मृतदेह एका ड्रममध्ये टाकण्यात आला होता आणि त्यात काँक्रीट भरण्यात आले होते. पोलिसांनी ड्रम ताब्यात घेतला आणि पोलीस ठाण्यात आणला आणि नंतर कटरने ड्रम कापून मृतदेह बाहेर काढण्यात आला. सौरभ राजपूतचा मोठा भाऊ राहुल उर्फ बबलू याने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मंगळवारीच दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
How you CAN’T get away with murder!
— Nabila Jamal (@nabilajamal_) March 19, 2025
Saurabh Rajput, a Merchant Navy officer brutally stabbed and dismembered by his wife Muskan Rastogi and her lover Sahil Shukla on March 4th
The duo sealed his remains in a plastic drum with cement, trying to erase all traces
Adding to the… pic.twitter.com/y1XX4WAjGP
बुधवारी या हत्येबद्दल एएसपी मेरठ आयुष विक्रम सिंह यांनी माध्यमांना सांगितले की, “सौरभ राजपूत ४ मार्चपासून दिसला नाही. संशयाच्या आधारे त्याची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले.”
“चौकशीदरम्यान, साहिलने मुस्कानसोबत मिळून सौरभची हत्या केल्याचे आढळून आले. हत्येनंतर, मृतदेहाचे डोके आणि दोन्ही हातांचे तळवे कापून ड्रममध्ये टाकण्यात आले आणि त्यात सिमेंट आणि वाळूचे मिश्रण भरण्यात आले. त्यानंतर, दोन्ही आरोपी शिमला, मनाली आणि कसौली येथे सहलीसाठी गेले.”
मेरठच्या ब्रह्मपुरी भागातील रहिवासी सौरभ राजपूतने २०१६ मध्ये त्याच्या घरापासून थोड्या अंतरावर राहणाऱ्या मुस्कान रस्तोगीसोबत प्रेमविवाह केला होता. कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता दोघांनीही लग्न केले. २०१९ मध्ये मुस्कानने एका मुलीला जन्म दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने सौरभचे त्याच्या पालकांशी मतभेद झाले होते, त्यानंतर तो शेजारच्या इंदिरा नगरमध्ये मुस्कानसोबत राहू लागला.
एएसपी आयुष विक्रम सिंह म्हणाले, “२७ वर्षीय साहिल सौरभच्या घरापासून थोड्या अंतरावर राहत होता. तो आणि मुस्कान वर्गमित्र होते. साहिलने बी.कॉम पर्यंत शिक्षण घेतले आहे आणि तो ऑनलाइन ट्रेडिंग व्यवसायात गुंतलेला होता.”
त्यांच्या मते, जेव्हा सौरभला त्याची पत्नी आणि साहिल यांच्यातील संबंधांबद्दल कळले तेव्हा त्याने २०२१ मध्ये घटस्फोटाचा कायदेशीर मार्ग स्वीकारला, परंतु लहान मुलगी असल्याने कुटुंबातील सदस्यांनी समजावून सांगितल्यानंतर त्याने तक्रार मागे घेतली.
Muskan Rastogi brut@lly k!lled her husband Saurabh Rajput with the help of her boyfriend Sahil Shukla in Meerut, UP
— Veena Jain (@DrJain21) March 19, 2025
Godi media is not interested in this case as no Muslim involved in this
After 2014 Religion of Criminal is more important than Crime 🙌
pic.twitter.com/YyNZ8kmJ85
३-४ मार्च रोजी काय घडले?
चौकशीदरम्यान मुस्कानने तिचा गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मुस्कानने पोलिसांना सांगितले की, सौरभ दोन वर्षांपूर्वी कामासाठी लंडनला गेला होता. या काळात मुस्कान आणि साहिलमधील मैत्री आणखी वाढली. मुस्कानने पोलिसांना सांगितले की सौरभचा पासपोर्ट कालबाह्य होणार होता आणि तो २४ फेब्रुवारी रोजी नूतनीकरण करण्यासाठी भारतात येत होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुस्कान आणि साहिलने आधीच हत्येची संपूर्ण योजना आखली होती आणि त्यांनी चाकू आणि बेशुद्धीची औषधे खरेदी केली होती.
हेही वाचा – १ एप्रिलपासून या मोबाईल नंबरवर UPI काम करणार नाही, जाणून घ्या कारण
हत्येच्या दिवशी, म्हणजे ३ मार्चच्या रात्री, मुस्कानने सौरभच्या जेवणात बेशुद्धीचे औषधे मिसळले. आणि जेव्हा तो बेशुद्ध पडला तेव्हा साहिलने सौरभचा हात धरला आणि मुस्कानने त्याच्यावर चाकूने अनेक वार केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी मृतदेह बाथरूममध्ये नेला आणि त्याचे तीन तुकडे केले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी खोली ब्लीचिंग पावडरने धुतली. ४ मार्च रोजी मुस्कानने बाजारातून एक ड्रम आणि सिमेंट विकत घेतले आणि नंतर शरीराचे सर्व भाग त्यात सिमेंटने भरले.
मृतदेह लपवल्यानंतर, मुस्कान तिच्या मुलीला तिच्या आईकडे सोडून साहिलसोबत फिरायला गेली. पोलिसांनी सांगितले की, लग्न झाल्यापासून सौरभला त्याच्या कुटुंबाने वाळीत टाकले आहे आणि त्यांनी त्याच्याशी फारसा संपर्क ठेवला नाही. म्हणूनच हे प्रकरण बरेच दिवस कळू शकले नाही. १७ मार्च रोजी मुस्कान परत आली तेव्हा तिच्या सहा वर्षांच्या मुलीने तिचे वडील सौरभबद्दल विचारले. यावर मुस्कान भावुक झाली. ती तिच्या आईवडिलांच्या घरी पोहोचली आणि सौरभच्या हत्येचा आरोप तिच्या सासरच्या लोकांवर करू लागली, परंतु मुस्कानच्या कुटुंबाला विश्वास बसला नाही म्हणून ते स्वतः तिला पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
चौकशीदरम्यान, मुस्कानने तिचा गुन्हा कबूल केला ज्यानंतर ड्रम जप्त करण्यात आला.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!