

Singer Jubin Nautiyal Accident : लोकप्रिय पार्श्वगायक जुबिन नौटियालबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. ताज्या वृत्तानुसार, जुबिन गुरुवारी एका अपघातात जखमी झाला. त्यांना मुंबईतील रुग्णालयात नेण्यात आले. इमारतीच्या जिन्यांवरून पडल्यानंतर त्याच्या कोपराला, बरगड्यांना आणि डोक्याला दुखापत झाली. नुकतेच जुबिन नौटियालचे ‘तू सामना आये’ हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे त्याने श्रीलंकन गायक योहानीसोबत गायले आहे.
या अपघातानंतर जुबिन नौटियालच्या उजव्या हाताचे ऑपरेशन करावे लागणार आहे. जुबिनने इंडस्ट्रीत खूप मेहनत करून एक गायक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याच्या लोकप्रिय गाण्यांमध्ये रतन लांबियां, लूट गए, हमनवा मेरे, तुम ही आना, बेवफा तेरा मासूम चेहरा या सुपरहिट गाण्यांचा समावेश आहे.
हेही वाचा – Innova Crysta CNG : इनोव्हा क्रिस्टामध्ये येणार कंपनी फिटेड CNG..! वाचा केव्हा होणार लॉन्च
Singer Jubin Nautiyal sustains multiple injuries after falling down stairs
Read @ANI Story | https://t.co/8bHmcjWkSR#JubinNautiyal #Jubin #Accident pic.twitter.com/NQS6YAoPzp
— ANI Digital (@ani_digital) December 2, 2022
काही दिवसांपूर्वी झाला ट्रोल
जुबिन नौटियाल अलीकडेच प्रकाशझोतात आला जेव्हा #ArrestJubinNautyal सोशल मीडियावर त्याला ट्रोल करणाऱ्यांनी ट्रेंड केला होता. लोक जुबिनवर नाराज होते कारण त्याचा आगामी कार्यक्रम अमेरिकेत होत होता आणि त्याच्या आयोजकावर खलिस्तानी असल्याचा आरोप केला जात होता. यामुळे लोक इतके संतप्त झाले की त्यांनी जुबिनलाही अटक करण्याचे आवाहन केले. सोशल मीडियावर युजर्सनी त्याला देशद्रोही म्हणायला सुरुवात केली.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!