पुष्पा 2 प्रीमियर : 39 वर्षीय महिलेचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक, नक्की काय घडलं?

WhatsApp Group

Pushpa 2 Premiere Stampede : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ चित्रपटाचा बुधवारी हैदराबादमध्ये प्रीमियर झाला, यात मोठी चेंगराचेंगरी झाली. संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत एका 39 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्क्रिनिंगदरम्यान अभिनेत्याला पाहण्यासाठी गर्दी जमल्याने हा गोंधळ उडाला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिलसुखनगरमधील रेवती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिलेने पती भास्कर आणि दोन मुलांसह चित्रपटाच्या प्रीमियरला हजेरी लावली होती. रात्री 10.30 च्या सुमारास गोंधळ उडाला, जेव्हा स्क्रिनिंगला उपस्थित असलेला चित्रपट अभिनेता अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली होती.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पोलीस आणि आसपासचे लोक पीडितेच्या मदतीसाठी धावताना दिसत आहेत. रेवतीला रुग्णालयात नेण्यापूर्वी तिला सीपीआर देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मुलाची प्रकृती चिंताजनक आहे, तर रेवतीचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा – Supreme Court Recruitment 2024 : सर्वोच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी! पगार ₹67,000 पर्यंत; लवकर भरा अर्ज

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अल्लू अर्जुनच्या आगमनाची बातमी पसरताच गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. अभिनेत्याच्या जवळ जाण्यासाठी अनेकांची धावपळ सुरू झाली. अभिनेत्याच्या सुरक्षेसाठी त्याला पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घेरले होते.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पोलीस जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज करतानाही दिसत आहेत. आयएएनएसच्या वृत्तानुसार, थिएटरच्या बाहेरील गोंधळात थिएटरचे मुख्य गेटही कोसळले. अल्लू अर्जुनही चित्रपटगृहात असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा तैनात करून सुरक्षा वाढवली.

सुकुमार यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 2021 मध्ये रिलीज झालेल्या ‘पुष्पा: द राइज’चा हा सिक्वेल आहे. हा चित्रपट 10 हजार स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. यात अल्लू अर्जुनसह रश्मिका मंदान्ना, फहद फासिलसह अनेक स्टार्स आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment