

मुंबई : सध्या भारतात राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची चर्चा आहे. भारतात दर पाच वर्षांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होतात. यावेळी १८ जुलै रोजी ही निवडणूक होणार आहे. अमेरिकेबद्दल बोलायचं झालं तर इथं राष्ट्राध्यक्ष चार वर्षातून एकदा निवडला जातो. पण जगात असाही एक देश आहे जिथं दरवर्षी राष्ट्रपती बदलला जातो. त्यासाठी दरवर्षी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होतात. हा देश नेमका कोणता आहे आणि दरवर्षी इथला राष्ट्रपती का बदलला जातो? घ्या जाणून…
स्वित्झर्लंड हा जगातील एकमेव देश आहे जिथं दरवर्षी नवे राष्ट्रपती नियुक्त केले जातात. येथील राष्ट्रपतींचा कार्यकाळ एक वर्षांपेक्षा जास्त नसतो. एकदा एखादी व्यक्ती राष्ट्रपती झाली की त्या व्यक्तीला पुन्हा निवडणूक लढवता येत नाही.
निवडणूक कशी असते?
स्वित्झर्लंडमध्ये राष्ट्रपती निवडणुकीसाठी दरवर्षी डिसेंबरमध्ये संसदेचं अधिवेशन बोलावलं जातं. राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष राष्ट्रपतीपदासाठी निवडलेल्या उमेदवारांची नावं जाहीर करतात. यानंतर, कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृहातील लोक त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराचं नाव लिहून मतपेटीत टाकतात. ज्याला सर्वाधिक मतं मिळतात त्याला राष्ट्रपती घोषित केलं जातं.
भारतात काय आहे राष्ट्रपती निवडणुकीची पद्धत?
भारतात राष्ट्रपती अप्रत्यक्ष निवडणुक पद्धतीनं निवडला जातो. देशातील जनता थेट राष्ट्रपती निवडत नाही, तर त्यांच्या मतानं निवडून आलेले प्रतिनिधी (खासदार, आमदार) राष्ट्रपतीची निवड करतात. याला अप्रत्यक्ष निवडणूक म्हणतात. या प्रक्रियेत मतदानाचा अधिकार निवडून आलेल्या आमदार-खासदारांना असतो. संसदेचे नामनिर्देशित सदस्य आणि विधान परिषदेचे सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करू शकत नाहीत, कारण ते लोकांकडून थेट निवडले जात नाहीत.
We (opposition parties) have unanimously decided that Yashwant Sinha will be the common candidate of the Opposition for the Presidential elections: Congress leader Jairam Ramesh pic.twitter.com/lhnfE7Vj8d
— ANI (@ANI) June 21, 2022
Proud to present the very simple and down to earth Presidential @rashtrapatibhvn candidate of NDA Smt. #DraupadiMurmu ji. She is performing early morning prayers at her local Shiva temple.#ॐ_नमः_शिवायः 🙏#Draupadi_Murmu @ANI @sudhirchaudhary @WIONews @amitmalviya pic.twitter.com/J7QHW15aIM
— Prabin Padhy (@prabinkp) June 22, 2022
भारताचा राष्ट्रपती होण्यासाठी पात्रता काय आहे?
राष्ट्रपती पदाचा उमेदवार होण्यासाठी अनेक पात्रता असणे आवश्यक आहे. कलम ५८ अन्वये, राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार हा भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. त्यानं वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावी. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी पात्र असणं आवश्यक आहे. तसंच भारत सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकारच्या अंतर्गत किंवा असलेल्या कोणत्याही स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणाच्या अंतर्गत लाभाचं कोणतंही पद उमेदवारानं धारण केलेलं नसावं.