

उत्तराखंडच्या उत्तरकाशीच्या सिलक्यारा बोगद्यात 41 मजूर 13 दिवसांपासून अडकले आहेत. गुरुवारी (23 नोव्हेंबर) कामगारांना बाहेर काढले जाईल, अशी अपेक्षा होती, मात्र मशीनमध्ये बिघाड झाल्याने बचावकार्य थांबवावे लागले. शुक्रवारी पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. कोणताही अडथळा न आल्यास सायंकाळपर्यंत सर्व कामगारांना बोगद्यातून बाहेर काढण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. ONGC, SJVNL, RVNL, NHIDCL आणि THDCL उत्तरकाशी बोगद्याच्या बचाव कार्यात गुंतलेले आहेत. एवढेच नाही तर परदेशी तज्ज्ञ आर्नोल्ड डिक्स (Arnold Dix) यांनाही पाचारण करण्यात आले आहे. आर्नोल्ड डिक्स कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्याचे नेतृत्व करत आहेत.
आर्नोल्ड डिक्स हे ऑस्ट्रेलियाचे नागरिक आहेत आणि ते आंतरराष्ट्रीय टनेलिंग आणि अंडरग्राउंड स्पेस असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. डिक्स यांनी अशी अनेक बचावकार्ये यशस्वीपणे पार पाडली आहेत, त्यामुळे 41 मजुरांना बाहेर काढण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.
आर्नोल्ड डिक्स कोण आहेत?
आर्नोल्ड डिक्स यांनी अनेक नैसर्गिक आपत्तींमध्ये विशेष भूमिका बजावली आहे. यामुळे बचावकार्य यशस्वीपणे पूर्ण करण्यात ते तज्ञ मानले जातात. ते भूमिगत बोगदे आणि वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये तज्ञ आहेत. प्रकल्पाच्या बांधकामापासून ते तांत्रिक बाबींपर्यंत सर्व काही सुरक्षेची काळजी घेत डिक्स यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण केले जाते. भूमिगत काम करताना कोणकोणत्या समस्या उद्भवू शकतात, कोणते धोके आहेत, ते कसे टाळायचे, याविषयीचे सल्ले डिक्स प्रकल्पाशी संबंधित लोकांना देतात. भूगर्भातील बोगदे बनवण्यात तज्ज्ञ म्हणून त्यांची जगभरात ओळख आहे.
उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी 13 दिवसांपासून मशीन्स सतत काम करत आहेत, टीम मजुरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. या कामात गुंतलेल्या लोकांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक अडथळ्यांमुळे बचावकार्य मध्यंतरी थांबवावे लागले, मात्र पुन्हा काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, अरनॉल्ड डिक्स यांनीही 41 कामगारांना निश्चितपणे बाहेर काढले जाईल, असे आश्वासन दिले आहे. यापूर्वी त्यांनी गुरुवारी सायंकाळपर्यंत कामगारांना बाहेर काढण्याचे आश्वासन दिले होते. ऑपरेशन साईटवर पोहोचल्यानंतर डिक्स यांनी बचावकार्यात सहभागी असलेल्या टीमशी चर्चा केली आणि जागेची पाहणी केल्यानंतर कामगारांना नक्कीच बाहेर काढले जाईल असे आश्वासन दिले.
हेही वाचा – गावात चालू केली मसाले बनवणारी कंपनी, आता होतेय रोजची कमाई!
12 नोव्हेंबर रोजी संपूर्ण देश दिवाळी साजरी करत असताना, सकाळी 9.30 वाजता उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात टेकडी कोसळल्याने 41 मजूर अडकले होते. तेव्हापासून, देशभरातील आणि जगभरातील एजन्सी आणि तज्ञ कामगारांना बोगद्यातून बाहेर काढण्यासाठी काम करत आहेत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!