‘सरल वास्तू’ फेम चंद्रशेखर गुरुजींची हॉटेलमध्ये निर्घृण हत्या; घटनेचा VIDEO थरकाप उडवणारा!

WhatsApp Group

मुंबई : देशात एका हत्येची खळबळजनक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. कर्नाटकातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये ‘सरल वास्तू’ फेम चंद्रशेखर गुरुजी यांची चाकुनं वार करून हत्या करण्यात आली. हुबळी जिल्ह्यात आज मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली. शहरातील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये गुरुजी व्यवसायानिमित्त कोणालातरी भेटण्यासाठी आले होते, असा पोलिसांना संशय आहे. ही हत्या होत असतानाचा सीसीटीव्हीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या फुटेजमध्ये हॉटेलच्या रिसेप्शनवर दोन जण चाकू मारताना दिसत आहेत. ही घटना होत असताना तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी घाबरून घटनास्थळावरून पळ काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, हा गुन्हा करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथून अटक केलीय. घटनेची माहिती मिळताच हुबळीचे पोलीस आयुक्त लाभू राम घटनास्थळी पोहोचले. “तपासानंतर हत्येमागचा हेतू कळू शकेल. आम्ही कुटुंबीयांचे जबाबही नोंदवत आहोत”, असे राम म्हणाले आहेत.

कोण होते चंद्रशेखर गुरुजी?

चंद्रशेखर गुरुजींनी वयाच्या १४व्या वर्षी सैन्यात भरती होण्याचा प्रयत्न केला. त्यांची सैन्यात निवड झाली नसली तरी उत्तम शिक्षणाचं ध्येय त्यांनी ठेवलं. बागलकोटमधून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर त्यांनी मुंबईत कंत्राटदार म्हणून करिअरला सुरुवात केली. पुढं त्यांना मुंबईत नोकरी मिळाली, तिथेच ते स्थायिक झाले. त्यांची सामाजिक कार्यात सहभागी होण्याची इच्छा कमी झाली नाही. १९९५मध्ये शरण संकुल ट्रस्टची स्थापना झाली आणि विश्वस्त म्हणून त्यांनी सामाजिक कार्य सुरू केलं. १९९८ मध्ये त्यांनी पहिल्यांदा घर आणि वास्तूची स्वप्नं पाहण्यास सुरुवात केली. त्यांच्या हत्येच्या तीन दिवस आधी हुबळी येथे त्यांच्या कुटुंबातील एका मुलाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

बागलकोटमधील हुंडेकरा ओणी येथे चंद्रशेखर गुरुजींचं घर आहे. सध्या घर भाड्यानं आहे. त्यांनी प्राचीन भारतीय स्थापत्यशास्त्रावर आधारित एक साधी वास्तुरचना केली. सल्लागार म्हणून मान्यता मिळवली. लोकांच्या समस्यांवर ते सोपे उपाय सुचवायचे. लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या गुरुजींनी सरल वास्तू नावाची वाहिनी सुरू केली. अनेक खासगी वाहिन्यांवर ते दिसायचे. वास्तूनुसार भरमसाठ फी भरूनही समृद्धी न मिळाल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

Leave a comment