Bigg Boss Marathi : विशाल, जय, विकास आणि मीनल पुन्हा एकत्र..! पाहा Video

WhatsApp Group

Bigg Boss Marathi Fame Stars In Advertisement : सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची चर्चा जोरात रंगत आहे. मागील तिन्ही पर्वाप्रमाणे यंदाचेही पर्व जोरदार गाजेल, अशी आशा चाहते व्यक्त करत आहेत. मागील पर्वात विशाल निकम, जय दुधाणे, विशाल पाटील आणि मीनल शाह यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. आता या चोघांनी एका जाहिरातीत एकत्र येऊन लोकांना दिवाळीचे गिफ्ट दिले आहे. कलर्स मराठीने एक जाहिरात सर्वांसमोर आणली आहे. यात हे चोघे एकत्र दिसत आहेत.

बिग बॉस हा टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेचा रिअॅलिटी शो म्हटला जातो. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात सांगलीचा विशाल निकम विजेता ठरला होता. त्याचवेळी स्प्लिट्सविला विजेता जय दुधाणे या मोसमाचा पहिला उपविजेता ठरला. अधिक मतांमुळे विशालने जय यांचा पराभव केला. शोच्या सुरुवातीपासूनच विशाल नेहमीच आपला खेळ प्रामाणिकपणे खेळताना दिसला. या संपूर्ण सीझनमध्ये त्याने मित्र असो वा शत्रू सर्वांशी प्रेमभावाने खेळ करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा हा प्रयत्न लोकांना आवडला.

हेही वाचा – IND Vs PAK : रोहित शर्मा घाबरला, जेव्हा ‘तो’ बॉलिंग टाकायला आला..! पाहा Video

विशालला २० लाखांच्या रकमेचा चेक बक्षीस स्वरुपात मिळाले होते. या सीझनच्या टॉप ५ फायनलिस्टमध्ये रोडीज फेम मीनल शाह, जय दुधाणे, अभिनेता विशाल निकम, अभिनेता विकास पाटील आणि डॉ. उत्कर्ष शिंदे यांचा समावेश होता.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment