WhatsApp चा कॅमेरा होणार अधिक स्मार्ट! येतंय ‘नवं’ फीचर, कमी प्रकाशातही झकास फोटो

WhatsApp Group

WhatsApp Camera Update 2025 : तुम्हीही व्हॉट्सअ‍ॅपच्या कॅमेऱ्याने कमी प्रकाशात फोटो घेताना त्रासला असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. WhatsApp लवकरच आपल्या वापरकर्त्यांसाठी एक खास ‘नाईट मोड’ फीचर आणत आहे. यामुळे लो लाईटमध्येही उत्तम क्वालिटीचे फोटो घेता येणार आहेत.

या फीचरची टेस्टिंग सध्या Android च्या बीटा वर्जन 2.25.22.2 मध्ये सुरू आहे. पुढील काही दिवसांत हे फीचर अधिक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल.

‘नाईट मोड’ म्हणजे काय?

WABetaInfo च्या माहितीनुसार, काही यूजर्सना WhatsApp कॅमेऱ्यात चंद्रासारखा (moon icon) एक नवा आयकॉन दिसत आहे. हा आयकॉन ऑन केल्यानंतर कमी प्रकाशात फोटो घेतल्यावर WhatsApp चा AI फोटोची क्वालिटी आपोआप सुधारेल.

हेही वाचा – सोयाबीन, ऊस, कापूस… कोणत्या पिकाला किती कर्ज? वाचा 2025 चे नवीन दर!

या नव्या फीचरचे फायदे

  • कमी प्रकाशातही फोटो क्लियर येतील
  • एक्सपोजर आणि शॅडो स्वतः अ‍ॅडजस्ट होतील
  • नॉइज कमी होईल, डिटेल्स वाढतील
  • एक्सटर्नल लाइट किंवा फ्लॅशची गरज नाही
  • मोड ऑन केल्यानंतरच हे फीचर काम करेल

व्हॉट्सअ‍ॅप आणतंय आणखी अपडेट्स!

नुकतेच WhatsApp ने कॅमेऱ्यात रिअल-टाईम फोटो/व्हिडीओ फिल्टर्स जोडले होते. यापूर्वी हे इफेक्ट्स फक्त व्हिडीओ कॉलिंगसाठी उपलब्ध होते. आता फोटो काढतानाच फिल्टर्स लावता येणार आहेत.

याशिवाय, एक नवीन अपडेटमुळे वापरकर्ते Instagram किंवा Facebook वरून थेट प्रोफाइल फोटो इम्पोर्ट करू शकणार आहेत. सध्या फोटो बदलताना गॅलरी, कॅमेरा, अवतार किंवा AI जनरेटेड फोटोचेच पर्याय असतात.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment