PAN-Aadhaar Linking : भारत सरकारने पॅन-आधार लिंकिंगची अंतिम मुदत जाहीर केल्यानंतर देशभरातील करदात्यांमध्ये मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. “नेमकं कोणाला पॅन आणि आधार लिंक करणं बंधनकारक आहे आणि कोणाला सूट आहे?” असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. आयकर कायद्यात काही विशिष्ट व्यक्तींना या नियमातून स्पष्ट सूट देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हीही या सूट मिळणाऱ्या गटात असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.
कोणाला PAN-Aadhaar Linking पासून सूट आहे?
खालील व्यक्तींना पॅन-आधार लिंक करण्याची कायदेशीर आवश्यकता नाही:
- NRI (Non-Resident Indians) — जे भारतात कररहिवासी मानले जात नाहीत.
ज्यांच्याकडे आधार क्रमांक नाही. - सरकारकडून विशेष सूट मिळालेल्या व्यक्ती.
- 80 वर्षे किंवा त्यापुढील वयाचे सुपर-सीनियर नागरिक.
- आसम, मेघालय आणि जम्मू-काश्मीर येथील रहिवासी.
या सर्वांना पॅन-आधार लिंकिंग बंधनकारक नाही.
आधार तुमच्यासाठी बंधनकारक नसेल तर?
येथे एक महत्त्वाची बाब समजून घ्या. आधार तुमच्यासाठी लागू नसेल तर PAN-Aadhaar लिंकिंगही बंधनकारक नाही.
मात्र जर तुम्ही स्वेच्छेने आधार घेतला असेल, तर मग PAN-Aadhaar Linking करणं बंधनकारक ठरतं.
हेही वाचा – लोक कपड्यांशिवाय साजरं करणार नवीन वर्ष! ‘न्यूड न्यू इयर पार्टी’ची जबरदस्त चर्चा!
संयुक्त बँक खाते किंवा इन्व्हेस्टमेंट असल्यास?
पॅन-आधार लिंकिंग ही व्यक्तिगत पातळीवरील प्रक्रिया आहे. संयुक्त बँक खाते, डिमॅट खाते किंवा गुंतवणुकीत प्रत्येक PAN धारकाने वेगवेगळे लिंकिंग करणे आवश्यक आहे. जर एका धारकाचा PAN निष्क्रिय (Inoperative) झाला तर त्या PAN शी संबंधित व्यवहार अडचणीत येऊ शकतात.
अल्पवयीन मुलांचे PAN लिंक करणे आवश्यक का?
18 वर्षांखालील मुलांना PAN-Aadhaar लिंक करण्याची गरज नाही. परंतु, 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आधार बंधनकारक झाल्यावर लिंकिंग आवश्यक होते.
मृत व्यक्तींच्या PAN बाबत काय?
मृत व्यक्तींच्या PAN-Aadhaar Linking ची कोणतीही आवश्यकता नाही. कौटुंबिक सदस्यांनी पुढील काळातील अडचणी टाळण्यासाठी PAN नियमित प्रक्रियेद्वारे रद्द (Surrender) करणे उचित ठरते.
कुणासाठी PAN-Aadhaar Linking बंधनकारक आहे?
आयकर कायद्याच्या कलम 139AA नुसार 1 जुलै 2017 पूर्वी PAN मिळालेल्या आणि आधारसाठी पात्र असलेल्या प्रत्येक नागरिकाने आधार क्रमांक जोडणे आवश्यक आहे. निर्धारित वेळेत लिंक न केल्यास PAN Inoperative (निष्क्रिय) होऊ शकतो आणि आर्थिक व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा