World Cup 2023 : न्यूझीलंडचा धमाका, अफगाणिस्तानचा उडवला धुव्वा!

WhatsApp Group

World Cup 2023 NZ vs AFG In Marathi : वर्ल्डकप 2023 मध्ये न्यूझीलंडने आपल्या चौथ्या विजयाची नोंद केली आहे. चेन्नईत रंगलेल्या सामन्यात टॉम लॅथमच्या नेतृत्वात खेळणाऱ्या न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा तब्बल 149 धावांनी पराभव केला. या विजयासह न्यूझीलंड चांगल्या रनरेटनुसार गुणतालिकेत पहिल्या स्थानी विराजमान झाली आहे. एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने 6 गडी गमावून 288 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 34.4 षटकात 139 धावांवर आटोपला. न्यूझीलंड संघाचा नियमित कर्णधार केन विल्यमसन दुखापतीमुळे सामना खेळू शकला नाही. अफगाणिस्तानने आपल्या शेवटच्या सामन्यात विश्वविजेत्या इंग्लंडचा दिल्लीत पराभव करून खळबळ उडवून दिली होती.

न्यूझीलंड संघाने अफगाणिस्तानसमोर (NZ vs AFG) सामना जिंकण्यासाठी 289 धावांचे लक्ष्य ठेवले. हे लक्ष्य 200 धावांपेक्षा कमी होऊ शकले असते, परंतु अफगाणिस्तान संघाने 4 सोपे झेल सोडले, ज्याचा किवी फलंदाजांनी फायदा घेत ही मोठी धावसंख्या उभारली. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने 80 चेंडूत 71 धावांची शानदार खेळी केली. तर कर्णधार आणि यष्टीरक्षक टॉम लॅथमने 74 चेंडूत 68 धावा केल्या. सलामीवीर विल यंगनेही 54 धावांची अर्धशतकी खेळी खेळली. तर अफगाण संघाकडून अजमतुल्ला उमरझाई आणि नवीन उल हक यांनी 2-2 बळी घेतले. तर राशिद खान आणि मुजीब उर रहमान यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

हेही वाचा – Ronaldinho : कोलकातामध्ये ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो, पाहा VIDEO

अफगाणिस्तानची घसरगुंडी! (World Cup 2023 NZ vs AFG)

प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन, फिरकीपटू मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेत सामना अर्धा संपवला. अफगाणिस्तानकडून रहमत शाह याने सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. मागच्या सामन्यात अर्धशतक ठोकलेले रहमतुल्लाह गुरबाज (11) आणि इक्रम अलिखिल (19) यांना मोठी खेळी करता आली नाही. ट्रेंट बोल्टनेही 2 विकेट्स काढत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment