VIDEO : आता आकाशात धूम मचाले..! जगातील पहिली हवेत उडणारी बाईक आलीय; किंमत आहे ‘इतकी’

WhatsApp Group

World First Flying Bike : रस्त्यावरील बाईक हवेतून उडताना पाहणं किती रोमांचक असेल? साधारणपणे, बाईक रस्त्यावर धावण्यासाठी डिझाइन केली गेली आहे. मात्र तंत्रज्ञानाच्या या युगात आता बाईक हवेत उडू लागली आहे. जगातील पहिली उडणारी बाईक हवेत उडताना दिसली आहे. जगातील पहिली उडणारी बाईक अमेरिकेत दाखल झाली आहे. पहिली एअरबोर्न बाईक, XTurismo ही एक हॉवरबाईक आहे. २०२२ मध्ये डेट्रॉईट ऑटो शोमध्ये ही बाईक हवेत उडताना दिसली होती. तेव्हापासून हा बाईकचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

वेग किती आहे?

जगातील पहिली उडणारी बाईक XTURISMO आहे, ही अनोखी बाईक ४० मिनिटे हवेत उडण्यास सक्षम आहे. जर आपण त्याच्या वेगाबद्दल बोललो तर ते ६२ mph च्या वेगाने पोहोचू शकते. हा तपशील अधिकृतपणे ऑक्टोबर २०२१ मध्ये सादर केली गेली. अमेरिकेत पहिल्यांदा दिसलेल्या या बाइकला ‘लँड स्पीडर फॉर द डार्क साइड’ असं नाव देण्यात आलं आहे.

हेही वाचा – ट्रेनमध्ये बायकोच्या मृतदेहासह नवऱ्याचा ५०० किमीचा प्रवास..! कारण वाचाल तर डोळ्यात पाणी येईल

बाईकची किंमत किती आहे?

जगातील पहिली एअर फ्लाइंग बाईक XTURISMO ही AERWINS Technologies of Japan ने विकसित केली आहे. ही कंपनी एअर मोबिलिटी तंत्रज्ञान क्षेत्रात काम करते. कंपनीनं जपानमध्येच XTURISMO तयार केली आहे. Airwins Technologies चे संस्थापक आणि संचालक Shuhei Komatsu यांना २०२३ पर्यंत यूएस मार्केटमध्ये लॉन्च करण्याची अपेक्षा आहे. जर आपण XTurismo च्या किंमतीबद्दल बोललो तर ही बाईक सध्या ७७०,००० अमेरिकन डॉलर्समध्ये विकली जात आहे. बाईकचे भविष्यकालीन डिझाइन गेल्या दोन वर्षांपासून विकसित केले जात आहे. यात रायडर सुरक्षित राहण्यासाठी विविध प्रकारचे सेन्सर बसवण्यात आले आहेत. सध्या ही एक सिंगल रायडर बाईक आहे.

कशी खरेदी कराल?

जगातील पहिली उडणारी बाईक, XTURISMO, AERWINS Technologies च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ही बाईक तुम्ही बूक करू शकता. ही विक्री सध्या मर्यादित आहे. तुम्हाला ही बाईक लाल, निळा आणि काळा या तीन रंगात मिळेल. ती खरेदी करण्यासाठी तुम्हाला ६ कोटींहून अधिक खर्च करावे लागतील.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment