८ इंजिन, ६८२ डबे, ५,६४८ चाके… जगातील सर्वात लांब ट्रेन पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

WhatsApp Group

World Longest Train : भारतीय रेल्वेने काही काळापूर्वी देशातील सर्वात लांब मालगाडी “रुद्रास्त्र” पटर्‍यांवर धाववून नवा विक्रम केला होता. ४.५ किमी लांबीची ही मालगाडी ३५४ डब्यांनी सज्ज असून तिला ७ इंजिनची ताकद आहे. गंजख्वाजा स्थानकातून सुटून तिने गढवा रोडपर्यंत २०० किमीचा प्रवास अवघ्या ५ तासांत पूर्ण केला.

पण, तुम्हाला माहिती आहे का की जगातील सर्वात लांब ट्रेन भारतात नाही तर ऑस्ट्रेलियात आहे? आणि तिची लांबी ऐकल्यावर तुम्ही थक्क व्हाल!

७.३ किमी लांबी, ८ इंजिन, ६८२ डबे, ५,६४८ चाके!

जगातील सर्वात लांब ट्रेनचे नाव आहे “द ऑस्ट्रेलियन BHP Iron Ore Train”. ही एक मालगाडी असून तिची एकूण लांबी तब्बल ७.३ किलोमीटर आहे. कल्पना करा—या ट्रेनमध्ये २२ आयफेल टॉवर सहज मावतील! इतकी प्रचंड लांबीची ट्रेन चालवण्यासाठी केवळ १-२ इंजिन पुरेसे नसतात. त्यामुळे या राक्षसी ट्रेनला ८ इंजिनांची एकत्रित ताकद मिळते. या ट्रेनचे एकूण ५,६४८ चाके असून तिचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं आहे.

वजन आणि रेकॉर्ड्स

ही ट्रेन केवळ सर्वात लांब नाही, तर जगातील सर्वात जड रेल्वेगाडी देखील आहे. तिचे एकूण वजन १ लाख टनांपेक्षा अधिक आहे.

हेही वाचा – IRCTC च्या टेंडरने बदला नशीब, सरकारी जागेवर उघडा आपलं दुकान!

नावाचा अर्थ आणि उपयोग

या ट्रेनचं नाव BHP Iron Ore Train कारण ती लोह अयस्क (Iron Ore) वाहतुकीसाठी वापरली जाते. ती एकावेळी ९९,७३४ टन लौह अयस्क पोर्ट हेडलंडपर्यंत घेऊन जाते. ही सेवा २१ जून २००१ रोजी सुरू झाली.

प्रवास आणि वेळ

ही मालगाडी यांडी माईन (Yandi Mine) पासून पोर्ट हेडलंड (Port Hedland) पर्यंत २७५ किमी अंतर पार करते आणि हा प्रवास पूर्ण करायला तिला सुमारे १० तास लागतात.

अत्याधुनिक तंत्रज्ञान

या ट्रेनमध्ये अत्याधुनिक कंट्रोल सिस्टीम आहे. मुख्य इंजिनात बसलेला लोको पायलट उर्वरित सात इंजिनांना दूरून नियंत्रित करू शकतो, जरी ती इंजिनं ट्रेनमध्ये जवळपास १ किमी अंतरावर असली तरी!

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment