जगातील पहिला २०० मेगापिक्सेल कॅमेरा असलेला फोन लाँच झालाय..! किंमत आहे ‘इतकी’

WhatsApp Group

World’s First 200MP Camera Phone : Motorola कंपनीनं शेवटी आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोन आणि २०० मेगापिक्सेल कॅमेरा असलेला जगातील पहिला स्मार्टफोन लाँच केला आहे. त्याचं नाव Moto X30 Pro आहे. लॉन्च होण्याच्या, काही तासांपूर्वी त्याचा एक अधिकृत कार्यक्रम रद्द करण्यात आला. एवढंच नाही तर या मोबाईलबाबत अनेक लीक आणि अनेक रेंडर्स समोर आले आहेत. हा एक फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे आणि यात मजबूत बॅटरी बॅकअप देखील दिसेल. त्याच्या बाजूला कर्व्ड डिस्प्ले आहे. या फोनच्या बॅक पॅनलवर तीन इमेज सेन्सर देण्यात आले आहेत.

समोरच्या बाजुला ६.७३ इंचाचा OLED डिस्प्ले असेल. तसंच यामध्ये फुल एचडी प्लस रिझोल्युशनचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये कर्व्ड एजेस देण्यात आले आहेत, जे याला प्रीमियम लूक देण्यासाठी काम करतील. या फोनमध्ये टाइप सी यूएसबी पोर्ट आहे. यामध्ये खालच्या बाजूला स्पीकर ग्रिल देण्यात आला आहे.

Moto X30 Pro चे तपशील

Moto X30 Pro च्या स्पेसिफिकेशनबद्दल सांगायचं झालं, तर हा फोन Snapdragon 8 Plus Gen 1 चिपसेट सह येतो. यामध्ये अडव्हान्स ४ एनएमची प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर 8 Gen 1 चिपसेटसह येतो. तसेच, यात १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल.

Moto X30 Pro बॅटरी आणि फास्ट चार्जर

Moto X30 Pro मध्ये 4500 mAh बॅटरी आहे, जी 125 W फास्ट चार्जरसह येते. कंपनीचा दावा आहे की हा फोन फक्त ७ मिनिटांत ५० टक्के चार्ज होता. यात 50 वॅटचा वायरलेस चार्जर आहे.

हेही वाचा – ७० वर्षाची आजी पहिल्यांदा बनली ‘आई’..! लग्नाच्या ५४ वर्षानंतर दिला मुलाला जन्म

Moto X30 Pro चा कॅमेरा सेटअप

Moto X30 Pro चा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात जगातील पहिला २०० मेगापिक्सेल कॅमेरा आहे. हा प्रायमरी कॅमेरा आहे. यात Samsung ISOCELL HP1 200 चा सेन्सर आहे. यात दुसरा कॅमेरा ६० मेगापिक्सेलचा आहे.

Moto X30 Pro किंमत

या फोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झाल्यास, Motorola X30 Pro च्या 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY ३,६९९ म्हणजेच ४३,६०० रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्या 12GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY ४,१९९ म्हणजेच ४९,५०० रुपये आहे. त्याच्या टॉप एंड 12GB + 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY ४,४९९ म्हणजेच ५३,००० रुपये आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment