

Coffee Price Increase 2025 : इटलीसारख्या देशात कॉफी फक्त पेय नसून जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. मात्र आता इटलीतच नव्हे, तर संपूर्ण जगात कॉफीचे दर प्रचंड वाढले आहेत. यामागे एक मोठा कारणीभूत घटक आहे – हवामान बदल (Climate Change).
कॉफीची किंमत इतकी का वाढली?
2024 मध्ये जागतिक बाजारात कॉफीचे दर 38% पर्यंत वाढले. यामध्ये सर्वात जास्त झळ पोहचली अरेबिका आणि रोबस्टा या प्रकारांच्या कॉफीला. FAO (United Nations Food and Agriculture Organization) च्या अहवालानुसार:
- अरेबिका कॉफीची किंमत 58% वाढली
- रोबस्टा कॉफीची किंमत तब्बल 70% ने उसळी मारली
उत्पादक देश संकटात!
कॉफी उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये हवामान बदलामुळे परिस्थिती बिकट झाली आहे:
- विएतनाममध्ये सततच्या दुष्काळामुळे उत्पादनात 20% घट
- इंडोनेशियात मुसळधार पावसामुळे 16.5% नुकसान
- ब्राझीलमध्ये अपेक्षित वाढीऐवजी 1.6% घट
हेही वाचा – दारूची एक्सपायरी डेट असते का? वाइन आणि बीयर किती लवकर खराब होते?
हवामान बदल: कॉफीच्या मुळावर घाव
कॉफी हे पीक तापमान, आर्द्रता आणि हवामानातील बदलांप्रती अतिशय संवेदनशील असते. सततचा दुष्काळ, अतिवृष्टी, वाऱ्याचा अतिरेक – हे सर्व घटक फुलं येणं, बीन्स तयार होणं, आणि झाडांची वाढ यावर थेट परिणाम करत आहेत. त्यामुळेच उत्पादन घटतंय आणि दर झपाट्याने वाढत आहेत.
कॉफीप्रेमींना जबरदस्त आर्थिक झटका
कॉफी ही फक्त इटलीतच नव्हे, तर भारतात, अमेरिका, युरोपात देखील अनेकांच्या रोजच्या जीवनाचा भाग आहे. मात्र वाढलेल्या किमतींमुळे ग्राहक, कॉफी शॉप्स, आणि बिझनेस यांच्यावरही मोठा परिणाम होत आहे. जर ही स्थिती अशीच राहिली, तर भविष्यात कॉफी ही ‘लक्झरी’ पेय ठरेल.
ही परिस्थिती केवळ कॉफीच्या भाववाढीची नाही, तर ही जागरूकतेची हाक आहे. हवामान बदलाचं सावट आपल्याला नित्य उपयोगात येणाऱ्या गोष्टींवरसुद्धा कसा परिणाम करतंय, याचं हे ज्वलंत उदाहरण आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!