दिल्लीत वेगाने पसरतोय ‘हाच’ जीवघेणा व्हायरस! लक्षणं, उपचार आणि धोका काय? जाणून घ्या सविस्तर

WhatsApp Group

H3N2 Virus : भारताची राजधानी दिल्ली आणि एनसीआर परिसर सध्या H3N2 फ्लूच्या संसर्गाने हादरलेली आहे. हा विषाणू Influenza A चा एक उपप्रकार आहे जो मनुष्यांच्या श्वसनमार्गांवर आघात करतो. दिल्लीतील विविध रुग्णालयांनी यासंबंधी सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

H3N2 व्हायरस म्हणजे काय?

H3N2 हा Influenza A प्रकारातील एक विषाणू असून तो प्रामुख्याने श्वसनमार्गांवर परिणाम करतो. CDC (Centres for Disease Control) आणि WHO (World Health Organization) नुसार, हा विषाणू फक्त मानवांनाच नव्हे तर पक्षी आणि इतर प्राण्यांनाही संक्रमित करतो. काही प्रकरणांमध्ये, या विषाणूचे अनेक उपप्रकारही आढळले आहेत.

H3N2 चे प्रमुख लक्षणं कोणती?

WHO च्या माहितीनुसार, हा फ्लू सौम्य ताप-खोकल्यापासून गंभीर न्यूमोनिया आणि श्वसनसंस्थेच्या अपयशापर्यंत विविध लक्षणं दाखवतो. H3N2 ची सामान्य लक्षणं खालीलप्रमाणे:

  • थंडी वाजणे
  • सतत खोकला
  • ताप
  • मळमळ
  • उलट्या
  • घशात खवखव किंवा वेदना
  • स्नायूंमध्ये किंवा शरीरात दुखणं
  • काही प्रकरणांमध्ये जुलाब
  • शिंका आणि नाक वाहणं

जर श्वास घेण्यास त्रास होत असेल, छातीत दुखत असेल, ताप उतरत नसेल किंवा घसा गिळताना वेदना होत असतील तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हेही वाचा – जास्त साखर खाल्ल्याने डोळ्यांचा अंधत्वाकडे प्रवास? नवीन संशोधनामुळे अनेकांना धक्का!

H3N2 व्हायरस कसा पसरतो?

हा अत्यंत संसर्गजन्य व्हायरस आहे जो संक्रमित व्यक्तीच्या खोकल्यामधून, शिंकण्यामधून किंवा बोलताना बाहेर पडणाऱ्या थेंबांद्वारे पसरतो. याशिवाय, व्हायरस असलेल्या पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर तोंडाला किंवा नाकाला हात लावल्यानेही संसर्ग होऊ शकतो. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गरोदर महिला आणि आधीपासून असलेल्या आजारांनी ग्रस्त व्यक्तींसाठी हा फ्लू जीवघेणा ठरू शकतो.

खबरदारी आणि उपाय

  • Pulse Oximeter च्या साहाय्याने ऑक्सिजन पातळी सातत्याने तपासा
  • ऑक्सिजन लेव्हल 95% पेक्षा कमी असल्यास डॉक्टरांकडे तात्काळ जा
  • 90% पेक्षा खाली गेल्यास ICU ची गरज लागू शकते
  • स्वतःहून औषधे घेणे टाळा, नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या

उपचार काय आहेत?

H3N2 चा उपचार बहुतेक वेळा घरी आराम, पुरेसं पाणी प्यावं आणि ताप कमी करणाऱ्या औषधांवर (acetaminophen, ibuprofen) आधारित असतो. गंभीर लक्षणं असलेल्या किंवा धोका असलेल्या रुग्णांना डॉक्टर antiviral औषधे जसे की Oseltamivir आणि Zanamivir देण्याचा सल्ला देतात. WHO च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, लक्षणं सुरू झाल्यानंतर 48 तासांच्या आत antiviral औषधं सुरू केल्यास त्याचा जास्त फायदा होतो.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment