केसगळतीमुळं झोप उडालीय? मग आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा आणि टेन्शन फ्री व्हा!

WhatsApp Group

मुंबई : प्रत्येक महिलेची इच्छा असते की आपले केस काळे, जाड आणि लांब असावेत. सुंदर काळे-लांब केस व्यक्तिमत्व वाढवतात. काही लोकांचे केस लांब असतात पण केस खूप तुटतात. केसगळती रोखण्यासाठी लोक बाजारातील विविध प्रकारचे शॅम्पू आणि कॉस्मेटिक उत्पादनं वापरतात, ज्याचा कधी कधी केसांवर विपरीत परिणाम होतो. काही जण प्रदूषणामुळं, कोंड्यामुळं तर काही तणावपूर्ण जीवनशैलीमुळं केसगळतीच्या समस्येशी झगडत असतात. अनेक जण केस पांढरे होण्याच्या समस्येच्या मोठ्या प्रमाणात सामना करत असल्याचंही आढळतं. केस तुटण्याची अनेक कारणं आहेत, जसं की हार्मोनल बदल, शरीरात पोषक तत्वांची कमतरता आणि टाळूचं संक्रमण त्यामुळे केस गळण्याची समस्या सहसा उद्भवते.

केसगळतीचं प्रमुख कारण रोग प्रतिकारशक्तही आहे. कमी प्रतिकारशक्तीमुळंही केस तुटतात. जेव्हा रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असतं, तेव्हा केवळ शरीरच आजारी पडत नाही तर केस देखील आजारी पडतात म्हणजेच केस कमकुवत होऊन गळू लागतात. कमी प्रतिकारशक्ती केसांच्या मुळांना कमकुवत करते, ज्यामुळे केस गळतात. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून, आपण आपल्या केसांची वाढ मजबूत करू शकता. केसगळती टाळण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती कशी मजबूत करावी हे जाणून घेऊया.

केस मजबूत आणि निरोगी करण्यासाठी आहारात जीवनसत्त्वं आणि सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश करा.

आंबट (उदा. लिंबू) फळांचं सेवन केल्यानं तुम्ही तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करू शकता. आंबट फळं रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात, तसेच शरीर निरोगी ठेवतात. केसांसाठी संत्रा, लिंबू, किवी, आवळा, द्राक्षे, पेरू आणि मनुका या फळांचं सेवन करावं.

आहारात फायबरचं सेवन करा. फायबरयुक्त फळं आणि भाज्या रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि शरीर निरोगी ठेवतात.

औषधी गुणांनी समृद्ध असलेली तुळशी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते. तुळशीच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात आणि ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते.

आहारामध्ये नैसर्गिक पदार्थांचा वापर जास्तीत जास्त करा, प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होईल. कोबी, अंडी आणि मासे खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हळद, काळी मिरी आणि लसूण यांचं सेवन करा.

उन्हाळ्यात दिवसा दही खाल्ल्यानं आरोग्याला फायदा होतो तसेच रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.

महत्त्वाचं म्हणजे हे सर्व उपाय अतिशय सोपे आणि स्वस्त आहेत. या सर्व उपाययोजना करण्यापूर्वी आपण आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेऊन नैसर्गिक-आयुर्वेदिक औषधोपचार करू शकता.

Leave a comment