

मुंबई : पावसाळा म्हटलं की थंड वातावरण असतं. सर्वजण हा ऋतू एंजॉय करतात. दाटलेल्या ढगांचे फोटो काढताना अनेकांना तुम्ही पाहिलं असेल. सर्वसामान्य चर्चेनुसार ढगांचा पांढरा रंग आपण पाहतो, पण आकाशात ढगांचे वेगवेगळे रंग असतात. ढगांच्या रंगावर अनेक कविता आणि कथा लिहिल्या गेल्या आहेत. पावसाळ्यात आकाश अनेकदा ढगाळ काळं असतं. ढगांचा रंग पाहून पाऊस पडेल की नाही याचा अंदाज लोक बांधतात. कधी कधी असे अंदाज खरेही ठरतात. पण पाऊस नेमका पडतो कसा? ढगात पाणी येतं कुठून याची माहिती तुम्हाला आहे का?
पाऊस कसा पडतो?
ढग हे पाणी किंवा बर्फाचे बनलेले असतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बाष्पीभवन झालेलं पाणी ढग तयार करण्यासाठी वर येतं. बाष्पीभवनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पृथ्वीवर पाऊस पडतो. उष्णतेमुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया सुरू होते. ढग हे पाण्याचे छोटे थेंब असतात जे हवेतील पाण्याच्या वाफेच्या घनतेमुळे उंचावर तयार होतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून काही उंचीवर ढग तयार होतात, म्हणून ते वेगवेगळ्या आकाराचे असतात. ढगांना त्यांच्या आकाराच्या आधारावर चार वर्गात विभागले आहे. साधे ढग, कापसाचे ढग, स्तरित ढग आणि पावसाचे ढग.
साधे ढग
असे ढग सुमारे ८००० ते १२००० मीटर उंचीवर तयार होतात. हे पातळ आणि विखुरलेले ढग आहेत. ते पिसासारखे दिसतात आणि रंगानं पांढरे असतात. अशा ढगांमुळे पावसाची शक्यता फारच कमी असते.
कापसाचे ढग
हे ढग कापसासारखे दिसतात. ते सहसा ४००० ते ७००० मीटरच्या उंचीवर तयार होतात. असे ढग विखुरलेले असतात. त्यामुळे अशा ढगांमुळेही पाऊस पडत नाही.
हेही वाचा – जाणून घ्या…पृथ्वीवरचं ‘असं’ एकमेव बेट, जिथं प्रत्येक पावलावर आहेत विषारी साप!
स्तरित ढग
आकाशात ढगाचे वेगवेगळे स्तर असतात. तापमान कमी झाल्यावर हे ढग वेगवेगळ्या वाऱ्यांच्या मिश्रणामुळं तयार होतात. त्यांचा रंगही हलका पांढरा आणि तपकिरी असतो.
पावसाचे ढग
पावसाचे ढग वेगळे दिसतात. त्यांचा रंग काळा किंवा गडद राखाडी असतो. ते मध्यम स्तरावर तयार होतात, जे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळ असतात. सूर्याची किरणं तयार झाल्यानंतर त्या ढगांमध्ये प्रवेश करू शकत नाहीत, त्यामुळेच अशा ढगांनी सूर्य झकलेला असतो. पाऊस आणणाऱ्या ढगांचे थेंब मोठे असतात, त्यांच्या विखुरल्याने पाऊस पडतो.
ढगफुटी का होते?
पावसाचा अत्यंत उच्च प्रकार म्हणजे ढगफुटी. ढगफुटीमुळे प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो. पृथ्वीपासून १५ किमी उंचीवर ढगफुटी होते यामुळे होणारा पाऊस सुमारे १०० मिमी प्रति तास या वेगानं पडतो. काही मिनिटांत तो दोन सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो, त्यामुळं मोठा हाहाकार उडतो. हवामानशास्त्रानुसार, जेव्हा ढग आकाशात मोठ्या प्रमाणात पाणी घेऊन जातात आणि त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण होतो, तेव्हा ते अचानक फुटतात.