जाणून घ्या…पृथ्वीवरचं ‘असं’ एकमेव बेट, जिथं प्रत्येक पावलावर आहेत विषारी साप!

WhatsApp Group

साप किंवा नाग म्हटलं की प्रत्येकाच्या अंगावर शहारा येतो. जगातील सर्वात धोकादायक जीवांमध्ये यांचा उल्लेख केला जातो. जर चुकून साप समोर आला तर त्या व्यक्तीचे हात पाय थरथरू लागतात, अशा स्थितीत जर तुम्हाला अशा ठिकाणाविषयी सांगितलं जिथं फक्त आणि फक्त विषारी साप राहतात तर काय होईल? तुमची प्रतिक्रिया काय असेल? साओ पाऊलो, ब्राझील येथे एक बेट आहे, जे विषारी सापांचं बेट (Venomous Snakes’ Island) आहे आणि इथं कोणत्याही माणसाला परवानगी नाही.

जगात अनेक विषारी साप आहेत, एकदा चावल्यानंतर माणसाला जगणं जवळजवळ अशक्य होतं. साओ पाऊलो इथं स्थित इल्हा दा क्विमाडा ग्रांदे बेट (Ilha da Queimada Grande) हे जगातील सर्वात विषारी सापांचं निवासस्थान आहे, जिथं मानवांच्या येण्यावर पूर्ण बंदी आहे. ही जागा युक्रेनच्या स्नेक आयलंडपेक्षाही वेगळी आणि अत्यंत धोकादायक आहे. खऱ्या जीवनातील जुरासिक पार्क हे एक विलक्षण नैसर्गिक ठिकाण आहे, जे शेवटच्या हिमयुगानंतर समुद्र पातळी वाढण्यापूर्वी हजारो वर्षांपूर्वी मुख्य ब्राझीलपासून वेगळं झालं होतं. या नैसर्गिक घटनेनंतर या बेटावर फक्त सापच राहिले, जे जिवंत राहण्याच्या बळावर आक्रमक झाले.

हवेत उडून शिकार करतात साप!

साओ पाऊलोपासून ३२ किलोमीटर अंतरावर असलेल्या इल्हा डी क्विमाडा ग्रांडे बेटावर हजारो विविध प्रकारचं साप आढळतात, जे अत्यंत विषारी आहेत. असं म्हणतात की या बेटावर काही धोकादायक साप आहेत, जे उडी मारतात आणि पक्ष्यांना चावतात. येथे असलेला दुर्मिळ आणि सर्वात विषारी साप म्हणजे सोनेरी डोके असलेला गोल्डन लान्सहेड वाइपर (Golden Lancehead Pit Viper) जो फक्त याच बेटावर आढळतो. त्याचं विष इतकं घातक असल्याचं म्हटलं जातं की, मानवी मांसही विरघळून टाकतं.

फक्त नौदलाला जाण्याची परवानगी

या धोकादायक ठिकाणी पर्यटक किंवा सामान्य माणसाला जाण्यास परवानगी नाही. ब्राझिलियन नौदल आणि चिको मेंडेस इन्स्टिट्यूट फॉर बायोडायव्हर्सिटी कन्सर्व्हेशनचे निवडक संशोधकच या ठिकाणी भेट देऊ शकतात. १९०९ ते १९२० या काळात लाईट हाऊसच्या ऑपरेशनसाठी काही लोक तिथं राहत होते, पण आता सापांच्या भीतीनं कोणीही तिकडं जात नाही, असं सांगितलं जातं. शिकारी बेकायदेशीरपणे या बेटावर येत असल्याच्या काही अफवा पसरल्या असल्या तरी यातील सत्यता पुष्टी झालेली नाही.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment