‘या’ लोकप्रिय Pain Killer वर बंदी, 100 mg डोसवर सरकारचा थेट बॅन, जाणून घ्या कारण!

WhatsApp Group

Nimesulide Ban India : भारत सरकारने नागरिकांच्या आरोग्य सुरक्षिततेचा विचार करून 100 mg पेक्षा जास्त डोस असलेल्या नाइमेसुलाइड (Nimesulide) या Pain Killer औषधावर तात्काळ बंदी जाहीर केली आहे. ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट 1940 च्या कलम 26A अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून अशा प्रकारच्या ओरल फॉर्म्युलेशनचे उत्पादन, विक्री आणि वितरण आता देशभरात बंद राहील.

सरकारने स्पष्ट सांगितले आहे की 100 mg डोस असलेली नाइमेसुलाइड औषधे मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकतात. विशेषतः लिव्हरवर याचा टॉक्सिक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ड्रग्स टेक्निकल अॅडव्हायझरी बोर्डच्या सल्ल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

नाइमेसुलाइड ही एक Non-Steroidal Anti-Inflammatory Drug (NSAID) आहे. जगभरात तिच्या सेफ्टीवर अभ्यास सुरू असून लिव्हर डॅमेज आणि साइड इफेक्ट्सची चिंता सातत्याने व्यक्त केली जात आहे. सरकारच्या मते कम डोस असलेले सुरक्षित पर्याय बाजारात उपलब्ध असल्याने नागरिकांच्या हितासाठी हा निर्णय आवश्यक होता.

आधीही झाली आहे कारवाई

  • 2011 मध्ये 12 वर्षांखालील मुलांमध्ये नाइमेसुलाइडच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती
  • जानेवारी 2025 मध्ये पशुवैद्यकीय उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या नाइमेसुलाइडवरही पूर्ण बंदी आणली गेली

मार्केट रिसर्च फर्मच्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये नाइमेसुलाइड औषधांचा बाजार सुमारे ₹497 कोटींचा असून मागील 12 महिन्यांत यात सुमारे 11% वाढ झाली आहे.

लोकांसाठी याचा अर्थ काय?

➡️ 100 mg पेक्षा जास्त डोस असलेली Pain Killer गोळी आता उपलब्ध होणार नाही
➡️ Low-dose किंवा सुरक्षित पर्याय मात्र बाजारात मिळत राहतील
➡️ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय Pain Killer घेणे धोकादायक ठरू शकते

सरकारने सांगितले आहे की जनहित आणि आरोग्य सुरक्षेसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. नागरिकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधे वापरावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment