

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल ८५ डॉलरच्या खाली आले आहे. मात्र, भारतीय बाजारपेठेत राष्ट्रीय पातळीवर पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. आज १६ ऑगस्ट रोजी जाणून घेऊया कच्च्या तेलाच्या किमती आणि देशातील विविध शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत काय अपडेट आहे.
कच्च्या तेलाची किंमत
आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ८४.६९ डॉलर आहे. त्याच वेळी, WTI कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ ८०.७७ आहे. दरम्यान, देशातील अनेक भागात पेट्रोलच्या दराने प्रतिलिटर १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, तर डिझेलचा दरही बहुतांश ठिकाणी ९० रुपयांपेक्षा जास्त आहे.
महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर किती आहेत?
देशातील महानगरांबद्दल बोलायचे झाले तर आज (बुधवार) १६ऑगस्ट रोजी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
हेही वाचा – Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, ग्राहकांची गर्दी!
पेट्रोल-डिझेलचे दर रोज अपडेट होतात
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या आधारावर तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!