Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किमतीत अपडेट..! जाणून घ्या नवे दर

WhatsApp Group

Petrol Diesel Price Today : पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत सरकारी तेल कंपन्यांकडून दिलासा देण्यात येत आहे. बीपीसीएल, इंडियन ऑइल आणि एचपीसीएलने सोमवारी पेट्रोल-डिझेलचे दर कायम ठेवले आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह इतर प्रमुख महानगरांमध्ये किमती स्थिर आहेत. राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील शेवटचा बदल मे 2022 मध्ये झाला होता.

प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि डिझेलची किंमत 89.62 रुपये प्रति लीटर आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल 92.76 रुपये आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत 106.31 रुपये आणि डिझेलची किंमत 94.27 रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि एक लीटर डिझेल 94.24 रुपयांना विकले जात आहे.

हेही वाचा – IPL 2023 : अजिंक्य रहाणेचा सुपला शॉट..! चेंडू सीमारेषापार; पाहा Video

इतर शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

  • बंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर आहे
  • नोएडामध्ये पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर आहे
  • गुरुग्राममध्ये पेट्रोल 96.89 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
  • चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर आहे
  • हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर आहे
  • जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर आहे
  • पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर आहे
  • लखनऊमध्ये पेट्रोल 96.47 रुपये आणि डिझेल 89.66 रुपये प्रति लिटर आहे

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण

कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घट होत आहे. ब्रेंट क्रूड $0.27 किंवा 0.33 टक्क्यांनी घसरून $81.39 प्रति बॅरल आणि WTI क्रूड $0.32 किंवा 0.41 टक्क्यांनी घसरून $77.55 प्रति बॅरल होते. अलीकडच्या काळात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $86 वरून $81 प्रति बॅरलपर्यंत घसरली आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment