

Tatkal Waiting List Fare Return Policy : भारतीय रेल्वे प्रवाशांच्या प्रत्येक श्रेणीनुसार सेवा पुरवते, परंतु लोकांना वेटिंग तिकिटांबाबत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तसे, उशिरा तिकीट बुक करणाऱ्यांसाठी रेल्वेने तत्काळ तिकिटांची व्यवस्था केली आहे. परंतु काहीवेळा मागणी जास्त असल्याने तत्काळमध्येही वेटिंग तिकीट उपलब्ध असते. तत्काळमध्ये वेटिंग तिकिटांबाबत वेगवेगळे नियम आहेत, जे प्रत्येक प्रवाशाला जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तत्काळ वेटिंगबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, त्यात एक प्रश्न महत्त्वाचा आहे की, जर तत्काळमध्ये तिकीट कन्फर्म झाले नाही तर पैसे परत मिळतील का? यासोबतच तुम्हाला हे देखील माहित आहे का की जर पैसे कापले गेले तर रेल्वेकडून किती शुल्क आकारले जाते?
वेटिंग तिकीट घेऊन प्रवास करू शकतो का?
तत्काळ वेटिंग तिकिटाबद्दल बोलायचे झाले तर, तत्काळ वेटिंग तिकीट घेऊनही प्रवास करता येत नाही. तत्काळ वेटिंग तिकिटाच्या बाबतीत, तिकीट रेल्वेकडून आपोआप रद्द केले जाते. तत्काळ तिकीट एक दिवस अगोदर बुक केले जाते आणि जर काही उशीर झाल्यामुळे प्रतीक्षा तिकीट बुक केले असेल तर तुम्ही प्रवास करू शकत नाही.
वेटिंग तिकीट बुक झाल्यावर रिफंड मिळते का?
वेटिंग तिकीट बुक केल्यास पैसे परत मिळत नाहीत, असा अनेकांचा समज आहे, पण तसे नाही. तत्काळ वेटिंग तिकीट रेल्वेने रद्द केल्यावर, रेल्वेकडून पैसे परत केले जातात. मात्र, रेल्वे त्याऐवजी बुकिंग शुल्क आकारते. तुमचे तिकीट कन्फर्म झाले नसले तरी बुकिंग शुल्क रेल्वेकडून घेतले जाते. या परिस्थितीत, जेव्हा तिकिटाचे पैसे रेल्वेला परत करावे लागतात, तेव्हा रेल्वे बुकिंग शुल्काव्यतिरिक्त पैसे परत करते.
हेही वाचा – Toilet Flush In Airplane : जेव्हा विमानात टॉयलेट फ्लश करता तेव्हा काय होते?
सोप्या भाषेत सांगायचे तर, वेटिंग तिकिटाच्या रिफंडमध्ये, काही पैसे रेल्वेकडून परत केले जात नाहीत, जे सुमारे १० टक्के आहे. मात्र, ते ट्रेन आणि त्याच्या वर्गावर अवलंबून असते. साधारणपणे, एसी क्लासच्या तिकिटाच्या रिफंडवर, रेल्वेकडून शुल्क म्हणून १००-१५० रुपये कापले जातात आणि उर्वरित पैसे खात्यात परत पाठवले जातात. स्लीपर क्लासमध्ये ही रक्कम थोडी कमी असते आणि शुल्क म्हणून कमी पैसे घेतले जातात.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!