‘झिरो फिगर’चं वेड! १६ वर्षाच्या मुलीचं जीवघेणं डाएटिंग; ICUमध्ये १२ तास मृत्यूशी झुंज

WhatsApp Group

Teen Hospitalized Due To Extreme Diet : “परफेक्ट फिगर” मिळवायच्या हट्टापायी एका १६ वर्षीय मुलीनं स्वतःचं आयुष्य धोक्यात घातलं. हुनान प्रांतातील मेई हिने ‘झिरो फिगर’ मिळवण्यासाठी अशी धोकादायक डाएटिंग केली की तिची अवस्था इतकी बिघडली की तिला थेट ICUमध्ये दाखल करावं लागलं. ही घटना सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे आणि अनेकांनी तरुण पिढीला शरीरापेक्षा आरोग्याला प्राधान्य द्या, असा सल्ला दिला आहे.

दोन आठवडे फक्त उकडलेल्या भाज्यांवर! शरीरच म्हणालं “बस आता!”

South China Morning Postच्या वृत्तानुसार, मेईनं आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं ‘साइज झिरो’ मिळवण्याचं लक्ष्य ठेवलं. त्या साठी तिने संपूर्ण दोन आठवडे केवळ उकडलेल्या भाज्याच खाल्ल्या. सुरुवातीला तिला वाटलं की ती योग्य मार्गावर आहे, पण काही दिवसांतच तिचं शरीर कमकुवत होऊन कोलमडून पडलं. एका दिवशी ती अचानक श्वास घेता न येऊन बेशुद्ध पडली आणि तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

डॉक्टरांची १२ तासांची झुंज; अंगात पोटॅशियम इतकं कमी की…

डॉक्टरांनी सांगितलं की मेईच्या शरीरातील पोटॅशियमचं प्रमाण अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचलं होतं. त्यामुळे तिच्या महत्वाच्या अवयवांनी काम करणं बंद केलं. डॉक्टरांनी तब्बल १२ तास मृत्यूशी झुंज देत तिचा जीव वाचवला. विशेष म्हणजे, शरीरात पोटॅशियमची कमतरता हृदयविकाराचा झटका देऊन थेट मृत्यूचं कारण ठरू शकते.

हेही वाचा – 8व्या वेतन आयोगासाठी कर्मचाऱ्यांची ‘विश लिस्ट’ जाहीर! जुनी पेन्शन, कॅशलेस उपचार, शिक्षण भत्ता…

“एक्सपर्टच्या सल्ल्याशिवाय डाएटिंग करणार नाही”

सुदैवानं डॉक्टरांनी वेळेवर उपचार करून मेईला वाचवलं. सध्या ती पूर्णपणे बरी होऊन घरी परतली आहे. तिच्या अनुभवावरून तिनं सांगितलं की, “आता मी कधीच डाएटिंग तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय करणार नाही. माझं आरोग्यच माझी खरी प्राधान्यक्रम असेल.”

मुलींनो, सौंदर्याच्या नावाखाली जीव धोक्यात घालू नका!

‘झिरो फिगर’ किंवा ‘परफेक्ट लूक’साठी स्वतःच्या आरोग्याशी तडजोड करणं म्हणजे धोक्याशी खेळणं आहे. फिटनेसपेक्षा फॅड डाएट फॉलो करणं शरीरासाठी घातक ठरू शकतं. डाएट करताना नेहमी डाएटिशियन किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. सौंदर्याचं काय, पण जीव एकदाच मिळतो!

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment