Video : किती तो साधेपणा..! सोनू सूदचा लोकल ट्रेननं प्रवास; स्टेशनच्या नळाचं पाणी पित म्हणाला…

WhatsApp Group

Sonu Sood Travels by Local Train : कोरोनाच्या काळात अगणित लोकांना मदत करून ‘गरीबांचा देव’ बनलेल्या अभिनेता सोनू सूदचे लाखो-करोडो चाहते आहेत. तो केवळ अभिनयातच पारंगत नाही, तर उदात्त कृत्ये करूनही त्याने लोकांच्या हृदयात प्रवेश केला आहे. सध्या त्याने मुंबईच्या लोकल ट्रेनचा प्रवास एन्जॉय केला. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो एका स्टेशनवर उतरतो आणि नळाचे पाणी पितो आणि कोणत्याही डिस्टिलरी आणि मिनरल वॉटरपेक्षा ते चांगले असल्याचे वर्णन करतो.

सोनू सूदने आपल्या रेल्वे प्रवासाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोनू म्हणतो की, इथलं जीवन कुठेही आढळत नाही. व्हिडिओमध्ये सोनू रेल्वे स्टेशनवर झोपलेला आणि नळातून पाणी पिताना दिसत आहे.

हेही वाचा –  Dasara 2022 : CM एकनाथ शिंदेंकडून दसऱ्याच्या शुभेच्छा; म्हणाले, “वाईट गोष्टींना दूर करून…”

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment