VIDEO : लोकल म्हणजे कुटुंबच! मोटरमन निवृत्त झाल्यावर प्रवाशांनी दिल्या शुभेच्छा

WhatsApp Group

Mumbai Local : मुंबईमध्ये दररोज लोकल ट्रेनने प्रवास करणारे प्रवासी एकमेकांना चांगले ओळखतात. याचा पुरावा व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला आहे. अंबरनाथ स्थानकात आलेल्या लोकल ट्रेनच्या मोटरमनची सेवानिवृत्ती प्रवाशांनी संस्मरणीय केली. मोटरमन एम.के. पुरूषोत्तम अनेक वर्षे सेवा केल्यानंतर आता निवृत्त झाले आहेत. बुधवारी ते 60 वर्षांचे झाले आणि त्याच दिवशी त्यांचा सेवेचा शेवटचा दिवस होता. सकाळी साडेआठ वाजता गाडी अंबरनाथ स्थानकावर थांबली तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्याला खूप पसंती दिली जात आहे.

बुधवारी अंबरनाथ स्थानकावरील मोटरमनची केबिन रोजच्या प्रवाशांनी फुलांनी सजवली. स्टेशनवर दिलेला भावनिक निरोप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करणारा तन्मय अडक म्हणाला, “अंबरनाथचा मोटरमन आज सकाळी 8:27 वाजता सेवानिवृत्त झाला… प्रवासी त्यांना निवृत्तीच्या शुभेच्छा देताना दिसले… काही गोष्टी फक्त #मुंबईकरच समजू शकतात.”

हेही वाचा – Ertiga आणि Innova ला टक्कर देणारी गाडी, लोकांचीही ठरतेय पहिली पसंत!

सेवानिवृत्त मोटरमनने TOI ला सांगितले, “हे आश्चर्यचकित होते… प्रवाशांना बाहेर पाहण्याची मला अपेक्षा नव्हती.” हा व्हिडिओ 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने म्हटले की, “आम्ही मुंबईकर नेहमीच नातेसंबंध निर्माण करतो, म्हणूनच आम्हाला स्वतःचा अभिमान वाटतो.” दुसऱ्या यूजरने लिहिले की, “मुंबईचे मोटरमन आमचे हिरो आहेत. आम्ही त्यांना निवृत्तीसाठी शुभेच्छा देतो.”

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment