IPL 2023 : सट्टा खेळणाऱ्या मुलाने संपवले जीवन, मग आईने दिला जीव!

WhatsApp Group

IPL 2023 Cricket Betting : महाराष्ट्रातील नागपुरात आयपीएल सट्टा खेळणाऱ्या तरुणाने मोठी रक्कम गमावल्यानंतर आत्महत्या केली. मुलाच्या मृत्यूनंतर आईची अवस्था बिकट झाली. त्यानंतर तिनेही विष प्राशन करून आपला जीवही दिला. मुलाच्या अंत्यसंस्काराच्या दिवशीच आईने हे भयानक पाऊल उचलले. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. महिलेची मुलगी मुंबईत कामाला असून तिच्या पतीचा व्यवसाय आहे.

ही घटना नागपूरच्या लकडगंज भागातील छपरुनगर संकुलातील आहे. येथे राहणारे व्यापारी नरेश वाघवानी यांचा मुलगा खितेन वाघवानी याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाच्या मृत्यूचा धक्का आईला सहन न झाल्याने तिनेही फिनाईल पिऊन आपले जीवन संपवले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश वाघवानी हे कुटुंबासह राहतात. त्यांचा इतवारीत मसाल्यांचा घाऊक व्यवसाय आहे. पत्नी दिव्या वाघवानी आणि मुलगा खितेन वाघवानी घरात होते. मुलगी मुंबईत काम करते. नरेशचा मुलगा खितेन हा वडिलांसोबत मसाल्याच्या दुकानात बसायचा.

हेही वाचा – ना दोन्ही पाय, ना एक हात, तरीही UPSC परीक्षा पास झालाय सुरज तिवारी!

आधी मुलाचा मृत्यू मग आई…

पोलिसांनी पुढे सांगितले की, 21 मे रोजी नरेश पत्नीसह नातेवाईकाच्या लग्नाला गेला होता आणि खितेन घरी एकटाच होता. घरातील सदस्य घरी परतले असता त्यांना खितेन खोलीतील पंख्याला दोरीने लटकलेले दिसला. मुलाची ही अवस्था पाहून नरेश आणि त्यांच्या पत्नीने आरडाओरडा केला.

शेजारी राहणाऱ्या लोकांच्या मदतीने खितेनला खाली उतरवून खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. याठिकाणी तपास करून खितेनचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. खितेनचा मृत्यू त्याची आई दिव्या हिला सहन न झाल्याने तिनेही पेटीत ठेवलेले फिनाईल प्यायले आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पत्नी आणि मुलाच्या मृत्यूने नरेश यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

खितेन खेळायचा आयपीएल सट्टा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खितेन हा आयपीएल सट्टा खेळत असे, अशी माहिती समोर आली आहे. त्याचे खूप मोठे नुकसान झाले होते. तेव्हापासून बुकी त्याला त्रास देत होते आणि पैशांची मागणी करत होते. यामुळे खितेनने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी नागपूर शहर झोन 5 चे डीसीपी गोरख भामरे म्हणाले की, गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment