14 हजार पुरुषांनी खाल्ला ‘लाडकी बहीण’ योजनेचा पैसा, 26 लाख लोकांनी सरकारला फसवलं!

WhatsApp Group

Ladki Bahin Yojana Scam Maharashtra : महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहीण योजना’त मोठा गैरव्यवहार उघड झाला आहे. 26 लाख फर्जी लाभार्थ्यांनी योजनेचा फायदा घेतल्याचे समोर आले असून, 14298 पुरुषांचाही समावेश असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सध्या या सर्व खात्यांवरील पैसे रोखण्यात आले आहेत.

महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती देताना सांगितले की, योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता तपासण्यासाठी सर्व संबंधित खात्यांकडून डेटा मागवण्यात आला. तपासणीत असे आढळून आले की, अनेकजण एकाच वेळी इतर शासकीय योजनांचाही लाभ घेत होते, तर काही कुटुंबांतील तीनपेक्षा अधिक सदस्यांनी योजनेचा लाभ घेतला होता.

यात सर्वात मोठा धक्का म्हणजे – ‘लाडकी बहीण’ या फक्त महिलांसाठीच्या योजनेचा लाभ अनेक पुरुषांनीही घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

जून २०२५ पासून २६.३४ लाख खात्यांचे पेमेंट रोखले

जून 2025 पासून या फर्जी लाभार्थ्यांचे पैसे थांबवण्यात आले असून, दुसरीकडे 2.25 कोटी पात्र महिलांना दरमहा ₹1500 ची मदत मिळाल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. योजनेच्या पुनर्तपासणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. पात्र ठरणाऱ्या महिलांना पुन्हा लाभ दिला जाणार आहे.

फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणार

मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, “या योजनेत गोंधळ घालणाऱ्या, चुकीची माहिती देणाऱ्या लाभार्थ्यांवर लवकरच कठोर कारवाई केली जाईल.”

हेही वाचा – मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवेचं ‘नवीन’ रेस्टॉरंट पाहिलंत का? नाव, लोकेशन आणि फोटोज व्हायरल!

विपक्षाकडून टीका, उपमुख्यमंत्र्यांचा इशारा

या घडामोडीनंतर विरोधकांनी सरकारवर टीका करत तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “ही योजना फक्त गरीब महिलांसाठी होती, पुरुषांसाठी नव्हे. फसवणूक करणाऱ्यांकडून संपूर्ण रक्कम वसूल केली जाईल, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.”

लाडकी बहीण योजना कधी आणि का सुरु झाली?

सदर योजना महायुती सरकारने 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केली होती. ज्यांचा वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांच्या खात्यात दरमहा ₹1500 थेट जमा केला जातो. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, हा योजनेचा प्रमुख उद्देश आहे. निवडणुकांदरम्यान या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे महायुतीच्या विजयात योजनेचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment