ग्रामीण महाराष्ट्राचा कौल स्पष्ट! 12 जिल्हा परिषद निकाल जाहीर; कोणत्या जिल्ह्यात कोणाची सत्ता?

WhatsApp Group

Maharashtra Zilla Parishad Result 2026 : महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदांचे निकाल जाहीर झाले असून, या निकालांनी ग्रामीण भागातील राजकीय सत्तासमीकरण स्पष्टपणे समोर आणले आहे. (Maharashtra 12 Zilla Parishad Result 2026)

या निवडणुकीसाठी एकूण 7,438 उमेदवार रिंगणात होते. 12 जिल्हा परिषदांच्या 731 जागा तसेच पंचायत समित्यांच्या 1,462 जागांसाठी शनिवारी मतदान पार पडलं होतं. या निवडणुकीत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा समावेश होता. निकालानंतर कुठे भाजपने मुसंडी मारली आहे, तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे वर्चस्व पाहायला मिळत आहे.

12 जिल्हा परिषदांचे संपूर्ण निकाल – जिल्हानिहाय पक्षीय बलाबल

1) रायगड जिल्हा परिषद निकाल 2026

एकूण जागा: 59

  • शिवसेना – 21
  • राष्ट्रवादी काँग्रेस – 16
  • भाजप – 15
  • शिवसेना (ठाकरे गट) – 5
  • काँग्रेस – 2

2) रत्नागिरी जिल्हा परिषद निकाल 2026

एकूण जागा: 56

  • शिवसेना (शिंदे गट) – 40
  • शिवसेना (ठाकरे गट) – 6
  • राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 5
  • भाजप – 4
  • मनसे – 1

3) सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निकाल 2026

एकूण जागा: 50

  • भाजप – 27
  • शिवसेना – 14
  • शिवसेना (ठाकरे गट) – 3
  • अपक्ष – 6

4) पुणे जिल्हा परिषद निकाल 2026

एकूण जागा: 73

  • राष्ट्रवादी काँग्रेस – 48
  • भाजप – 10
  • शिवसेना (ठाकरे गट) – 6
  • शिवसेना – 4
  • शरद पवार गट – 1

हेही वाचा – एकाच मताने सत्ता बदलली! धाराशिवच्या ढोकी पंचायत समितीत ठाकरे गटाचा थरारक विजय


5) सातारा जिल्हा परिषद निकाल 2026

एकूण जागा: 65

  • भाजप – 23
  • राष्ट्रवादी काँग्रेस – 22
  • शिवसेना – 13
  • काँग्रेस – 1
  • इतर – 2

6) सांगली जिल्हा परिषद निकाल 2026

एकूण जागा: 61

  • राष्ट्रवादी (शरद पवार गट) – 18
  • भाजप – 16
  • काँग्रेस – 11
  • शिवसेना (शिंदे गट) – 7
  • राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 6
  • इतर पक्ष – 3

7) कोल्हापूर जिल्हा परिषद निकाल 2026

एकूण जागा: 68

  • राष्ट्रवादी काँग्रेस – 20
  • काँग्रेस – 15
  • भाजप – 12
  • शिवसेना (शिंदे गट) – 9
  • इतर आघाड्या – 12

8) सोलापूर जिल्हा परिषद निकाल 2026

एकूण जागा: 68

  • भाजप – 36
  • राष्ट्रवादी काँग्रेस – 10
  • राष्ट्रवादी (शरद पवार गट) – 7
  • शिवसेना – 5
  • इतर – 10

9) छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निकाल 2026

एकूण जागा: 63

  • भाजप (पुरस्कृतसह) – 25
  • शिवसेना (पुरस्कृतसह) – 22
  • शिवसेना (ठाकरे गट) – 9
  • इतर – 7

10) परभणी जिल्हा परिषद निकाल 2026

एकूण जागा: 54

  • भाजप – 24
  • राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 15
  • शिवसेना (ठाकरे गट) – 6
  • शिवसेना – 5
  • काँग्रेस – 3

11) धाराशिव जिल्हा परिषद निकाल 2026

एकूण जागा: 55

  • भाजप – 19
  • शिवसेना (शिंदे गट) – 15
  • शिवसेना (ठाकरे गट) – 7
  • राष्ट्रवादी काँग्रेस – 6
  • काँग्रेस – 3
  • अपक्ष व इतर – 5

12) लातूर जिल्हा परिषद निकाल 2026

एकूण जागा: 59

  • काँग्रेस – 23
  • भाजप – 18
  • राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 12
  • इतर – 6

राजकीय विश्लेषण

या निकालांवरून स्पष्ट होते की ग्रामीण महाराष्ट्रात एकाच पक्षाचे वर्चस्व नाही. काही जिल्ह्यांत भाजपने आघाडी घेतली असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना गटांची पकड अजूनही मजबूत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी हे निकाल राजकीय दिशा ठरवणारे ठरणार आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment