Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी महाराष्ट्राचा 2026 सालाचा अर्थसंकल्प सादर केला. 28 जानेवारी रोजी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर वित्तमंत्री पद रिक्त असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनीच यंदाचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला.
या अर्थसंकल्पात राज्याच्या आगामी आर्थिक वर्षातील उत्पन्न-खर्चाचा आराखडा मांडण्यात आला असून शेतकरी, पायाभूत सुविधा, पर्यटन, महिला सक्षमीकरण आणि विमानतळ विकास यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे.
VIDEO | Maharashtra CM Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) presents state budget for 2026-27 in assembly. Fadnavis becomes the state's first chief minister to do so.
— Press Trust of India (@PTI_News) March 6, 2026
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7)
(Source: Third party) pic.twitter.com/XXHIt8gdct
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा – 2 लाखांपर्यंत कर्जमाफी
राज्य सरकारने निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार शेतकरी कर्जमाफीसाठी विशेष समिती स्थापन केल्याची घोषणा केली आहे.
Maharashtra Budget 2026 : कर्जमाफीच्या योजनेत कोणते शेतकरी असणार पात्र? Devendra Fadnavis#maharashtrabudget #DevendraFadnavis #maharashtrabudget2026 #Mahayuti pic.twitter.com/A5iDe9pBwH
— ABP माझा (@abpmajhatv) March 6, 2026
30 सप्टेंबर 2025 पर्यंत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महिला सक्षमीकरणावर भर
8 मार्च रोजी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. या योजनेसाठी अर्थसंकल्पात पुरेसा निधी राखून ठेवण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
पर्यटन क्षेत्रासाठी मोठी योजना
महाराष्ट्रातील पर्यटनाला मोठी चालना देण्यासाठी सरकारने महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे.
सध्या राज्यात दरवर्षी 16 कोटी पर्यटक येतात, ही संख्या 2047 पर्यंत 38 कोटींवर नेण्याचा सरकारचा मानस आहे. तसेच संपूर्ण पर्यटन अनुभव 100% डिजिटल करण्याचा आराखडाही सादर करण्यात आला आहे.
हेही वाचा – मोठी आणि महत्त्वाची बातमी! भारतीय विमानसेवा हळूहळू पुन्हा सुरू; पण…
5 ज्योतिर्लिंगांचा धार्मिक पर्यटन म्हणून विकास
देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. या पवित्र स्थळांचा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या धार्मिक पर्यटन केंद्रांप्रमाणे विकास करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
ठाणे-बोरिवली कनेक्टिव्हिटी प्रकल्प
मुंबईतील वाहतूक समस्या कमी करण्यासाठी ठाणे-बोरिवली जोडणी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
हा प्रकल्प जून 2028 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असून पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
गावागावात काँक्रीट रस्ते
ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी 1,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना काँक्रीट रस्त्यांनी जोडण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे.
यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक आणि विकासाला मोठी चालना मिळेल.
महाराष्ट्रात नवीन विमानतळ प्रकल्प
राज्यातील हवाई संपर्क सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
- गडचिरोलीमध्ये ग्रीनफिल्ड विमानतळासाठी जमीन संपादन सुरू
- लातूर विमानतळावर नाइट लँडिंग सुविधा सुरू होणार
- शिर्डी, नाशिक आणि रत्नागिरी विमानतळांचा विस्तार
या प्रकल्पांमुळे राज्यातील हवाई प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
अजित पवार यांच्या नावाने स्मारक आणि पुरस्कार
राज्याच्या राजकारणातील योगदान लक्षात घेऊन अजित पवार यांच्या नावाने स्मारक उभारण्याचा आणि पुरस्कार सुरू करण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे.
मुंबई-पुणे GCC कॉरिडॉरला वेग
मुंबई-पुणे दरम्यान विकसित होत असलेला ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (GCC) कॉरिडॉर देशातील आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि बॅक-ऑफिस केंद्रे उभारण्याचे सर्वात पसंतीचे ठिकाण बनत असल्याचे सरकारने नमूद केले.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा