

Maratha Reservation Protest : मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा समाजासाठी उपोषणाला बसलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून समर्थन मिळत आहे. मात्र, मुंबईत सततच्या पावसामुळे आणि प्रदीर्घ आंदोलनामुळे तिथे उपस्थित समाजबांधवांच्या जेवण-पाण्याची व्यवस्था कमकुवत भासत होती. हे ओळखून मिरज तालुका मराठा समाज सरसावला आणि अत्यंत अल्पावधीत मदतीचा वर्षाव करत एक नवीन इतिहास रचला.
कशा स्वरूपात मदत?
मिरजमधून अन्नदात्यांनी मोठ्या प्रमाणावर खालील गोष्टींचा पुरवठा केला:
- शेकडो पॅकेट्स भाकरी, चटणी, लोणचं
- फरसाण, बिस्किट्स, खाऊसाहित्य
- मोठ्या प्रमाणात पाण्याच्या बाटल्या
- ड्राय स्नॅक्स आणि अन्य आवश्यक वस्तू
या मान्यवरांचा मोलाचा सहभाग
या मदतकार्यात खालील व्यक्ती व संस्थांनी पुढाकार घेतला:
- डोंगरवाडी ग्रामस्थ
- दिपक दादा, जनसुराज्यचे अमित कदम
- आनंद सागर पुजारी, लिंगनूरचे चंद्रकांत नलवडे, दत्ता नलवडे
- इंजिनीअर शशांक जाधव, वाघेश जाधव, युवराज पवार, रोहित जाधव, धनंजय भिसे, सोमनाथ चव्हाण, मदन तांबडे
- मंगळवार पेठ मराठा समाज, रवींद्र काळे (ठाणेकर)
- वकील मितेश पवार आणि इतर असंख्य अन्नदाते
हेही वाचा – Viral Video : स्टेजवर अभिनेत्रीला स्पर्श करताना पवन सिंह कॅमेऱ्यात कैद; सोशल मीडियावर भयंकर ट्रोल!
मुंबईत आंदोलन सुरू, मिरजकरांची मोठी मदत; दोन ट्रकमधून अन्नसामग्री पाठवली!#MarathaReservation #ManojJarangePatil #OneMarathaOneFight #MirajSupportsMarathas #FoodForProtesters pic.twitter.com/6RpLLQDph6
— Vacha Marathi (@VachaMarathi) September 1, 2025
31 ऑगस्ट रोजी मदत रवाना
या मदतीचे साहित्य 31 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी मिरज रेल्वे स्थानकातून विशेष व्यवस्था करून मुंबईकडे रवाना करण्यात आले. ही मदत आंदोलनकर्त्या समाजबांधवांसाठी दिलासा ठरली.
आर्थिक मदत नाकारली, अन्नदात्यांचा गौरव
“एक भाकरी समाजासाठी!” या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम होता. त्यामुळे कोणतीही आर्थिक मदत स्वीकारली गेली नाही, यावर विशेष भर देण्यात आला.
सर्व अन्नदात्यांचे मनःपूर्वक आभार
या अन्नछत्रासाठी ज्या-ज्यांनी मोलाचे योगदान दिले – त्यांच्या दातृत्वाचा, संघटनशक्तीचा आणि समाजप्रेमाचा सर्वत्र गौरव होत आहे. या अभूतपूर्व एकतेमुळेच मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन अधिक प्रभावी होत आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!