

Dino Morea In Mithi River Desilting Scam : मिठी नदीच्या स्वच्छतेतील कथित भ्रष्टाचार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरिया यांची चौकशी केली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, या घोटाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) सुमारे ६५.५४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत, केतन कदम आणि जय जोशी या दोन मध्यस्थांना अटक करण्यात आली आहे.
EOW ने अभिनेता डिनो मोरियाला पुन्हा चौकशीसाठी समन्स पाठवले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिनो मोरिया आणि त्याच्या भावाला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. सोमवारी (२६ मे) दोघांचीही ईओडब्ल्यू अधिकाऱ्यांनी सुमारे ८ तास चौकशी केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदम हा डिनो मोरियाचा भाऊ सॅन्टिनो मोरियासोबत Ubo Ridez’ नावाच्या कंपनीत भागीदार असल्याचे तपासात समोर आले आहे. ही कंपनी मुंबईत व्हिक्टोरियन शैलीतील इलेक्ट्रिक बग्गींद्वारे पर्यटन सेवा पुरवते.
या सेवेचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते झाले होते, ज्यामध्ये केतन कदम देखील उपस्थित होते.
VIDEO | Mithi River desilting scam: Actor Dino Morea leaves from Economic Offences Wing office in Mumbai.
— Press Trust of India (@PTI_News) May 26, 2025
Morea was earlier today questioned by the EOW for his alleged links with two middlemen arrested in connection with the Mithi river desilting scam.
(Full video available on… pic.twitter.com/KskZFubDhN
हेही वाचा – कोरोनाचे ‘नवीन’ व्हेरिएंट का येतायत? त्याचं खरं कारण काय? जाणून घ्या
EOW च्या तपासानुसार, ‘उबो राइडेझ’ आणि केतन कदमशी संबंधित दुसऱ्या कंपनीमध्ये अनेक संशयास्पद आर्थिक व्यवहार झाले आहेत. एफआयआरमध्ये नोंदवलेल्या माहितीनुसार, केतन कदम हे ‘वोडर इंडिया’ कंपनीचे संचालक आहेत, तर पुनिता कदम आणि सॅन्टिनो मोरिया हे देखील त्यांच्या संचालक मंडळात समाविष्ट आहेत. सॅन्टिनो मोरिया यांची यापूर्वीही चौकशी करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, डिनो मोरिया आणि केतन कदम यांच्यातील अनेक फोन कॉल्सचे रेकॉर्ड सापडले आहेत, ज्यामुळे संशय आणखी वाढला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “या संशयास्पद व्यवहारांचे स्पष्टीकरण देण्यासाठी अभिनेता डिनो मोरिया आणि त्याच्या भावाला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.”
नक्की घोटाळा काय?
या घोटाळ्यात, बीएमसीने गाळ काढण्यासाठी आणि ड्रेजिंग मशीन भाड्याने घेण्यासाठी पैशांचा गैरवापर केल्याचा संशय आहे. आर्थिक गुन्हे शाखेचा (EOW) दावा आहे की कदम आणि जय जोशी यांनी कोची येथील मॅटप्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडून खरेदी केलेल्या मशीन्सच्या वास्तविक किमतीपेक्षा खूप जास्त पैसे महापालिकेला आकारले. अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की हे मेटप्रॉपच्या काही कर्मचाऱ्यांच्या आणि बीएमसीच्या स्टॉर्म वॉटर ड्रेन (SWD) विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने केले गेले.
डिनो मोरियाबद्दल….
डिनो मोरिया हा एक अभिनेता आणि माजी मॉडेल आहे ज्याला १९९० च्या दशकात लोकप्रियता मिळाली. त्याने १९९९ मध्ये ‘प्यार में कभी कभी’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, परंतु त्याला यश २००२ मध्ये आलेल्या ‘राझ’ चित्रपटाने मिळाले, ज्यामध्ये त्याने बिपाशा बसू सोबत काम केले. गेल्या काही वर्षांत, डिनोने हिंदी, तमिळ आणि कन्नड चित्रपटसृष्टीतील ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!