

Old Pension Scheme : देशात जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. नुकतेच, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने (KSGEA) कर्नाटकातील जुन्या पेन्शनच्या मागणीसंदर्भात आपली मागणी मांडली तेव्हा राज्य सरकारला कर्मचाऱ्यांना दिलासा जाहीर करावा लागला. कर्नाटकातील बोम्मई सरकारने कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात १७ टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय जुनी पेन्शन लागू करण्यासाठी येथे समिती स्थापन करण्यात आली होती.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीची घोषणा
महाराष्ट्रात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी आवाज उठवत मोठी घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना (OPS) पूर्ववत करण्याच्या मागणीवर विचार करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती जाहीर केली. ही समिती वेळेत अहवाल सादर करेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कर्मचारी संघटनांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील १७ लाख कर्मचारी आज संपावर आहेत.
हेही वाचा – Gold Silver Price Today : आज सोन्या-चांदीचे नवीन दर किती? इथं जाणून घ्या!
संपामुळे प्रशासनाच्या कामावर परिणाम
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना संपावर न जाण्याचे आवाहन केले. संपाचा प्रशासनाच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. शिंदे यांनी बैठकीत सांगितले, की ओपीएस लागू करणाऱ्या राज्यांकडून कोणतीही योजना किंवा धोरण मांडण्यात आलेले नाही. दरम्यान, आम आदमी पक्षाने पंजाबमधील (भगवंत मान) सरकारने केलेल्या ओपीएसच्या पुनर्स्थापनेला पाठिंबा दर्शवला आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!