

Rajmata Jijau Jayanti 2025 : 12 जानेवारीला राजमाता जिजाऊंची जयंती आहे. या पार्श्वभूमीवर परभणीच्या कलाकारांनी ‘शिंदखेडच्या वाटेनं गाऊ जिजाऊचं गाणं’ नवीन वर्षात लोकांसमोर आणलं आहे. नव्या युगातील स्त्रियांनाही ‘जिजाऊंचं माहेर’ हे आपलं माहेर वाटतं, ही भावना या गाण्यातून सादर करण्यात आली आहे.
राजमाता जिजाऊ सर्वांनाच प्रेरणा देतात. याच भावनेतून प्रा. डॉ. कल्याण कदम यांनी हे गाणं लिहिलं आणि संगीतबद्ध केलं आहे. संगीता मुळे यांच्या आवाजातील हे गीत सध्या चांगलंच चर्चेचा विषय ठरत आहे.
या गाण्यामध्ये योगिता राऊत, वैष्णवी अंभोरे, अनुजा मुकडे आणि किरण मुळे हे कलाकार दिसत आहेत. या गाण्याचे कलादिग्दर्शन बाबा डांगे यांनी केले असून त्याची निर्मितीखोपा क्रिएशनच्या आशा कल्याण कदम यांनी केली आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!