Raju Srivastava Death : राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयातून बाहेर आणतानाचा PHOTO व्हायरल!

WhatsApp Group

Raju Srivastava Death : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी (२१ सप्टेंबर) निधन झाले. १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. राजू श्रीवास्तव हे ५८ वर्षांचे होते. दिल्लीतील जिममध्ये व्यायाम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, अखिलेश यादव यांच्यासह सर्व बड्या नेत्यांनी आणि चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनी शोक व्यक्त केला.

राजू श्रीवास्तव यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ९.३० वाजता दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एम्स रुग्णालयामधून त्यांना बाहेर आणतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा फोटो शेअर केला आहे. राजू श्रीवास्तव यांच्या मेहुण्यानं सांगितले की, बुधवारी सकाळी त्यांचा रक्तदाब कमी झाला होता. यानंतर त्यांना सीपीआर देण्यात आला. प्रथम त्यांनी प्रतिक्रिया दिली. मात्र नंतर त्यांची प्राणज्योत मालवली. दोन ते तीन दिवसांत त्यांना व्हेंटिलेटरवरून काढावे लागले. दिल्लीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा – VIDEO : खळखळून हसाल..! राजू श्रीवास्तवची भन्नाट क्रिकेट कॉमेंट्री ऐकलीय का?

हेही वाचा – मुंबईच्या घाटकोपरमध्ये भीषण अपघात..! कारनं ८ जणांना उडवलं; पाहा VIDEO

राजू श्रीवास्तव यांचा जन्म २५ डिसेंबर १९६३ रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे झाला. बालपणी त्यांचे नाव सत्य प्रकाश श्रीवास्तव होते. राजूला लहानपणापासूनच मिमिक्री आणि कॉमेडीची खूप आवड होती. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कॉमेडी शोमधून राजू श्रीवास्तव यांना ओळख मिळाली. या शोच्या यशानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment