Video : कोल्हापुरात सचिन तेंडुलकरचं दर्शन..! ‘या’ ठिकाणी लेकासोबत दिली सरप्राइज भेट

WhatsApp Group

Sachin Tendulkar In Kolhapur : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर केवळ देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. सचिनची तुलना क्रिकेटचा देव अशीही केली जाते. मात्र, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये सचिन तेंडुलकर देवाचे दर्शन घेताना दिसत आहे. जगातील महान माजी फलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री दत्त महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा मुलगा अर्जुनही तेथे उपस्थित होता.

मंदिरातील पुजारी आणि इतर लोकांना सचिनच्या आगमनाची कल्पना नव्हती आणि ते आश्चर्यचकित झाले. सचिन पहाटे पहाटेच्या काकड आरतीला उपस्थित राहून परत मुंबईला गेल्याचे सांगण्यात आले. सचिनसोबत अर्जुननेही मास्क घातल्याने त्यांना कोणीही ओळखले नाही.

हेही वाचा – बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी..! पालकमंत्री अतुल सावेंची ‘मोठी’ घोषणा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment