Virar Swimming Pool Accident : महाराष्ट्रातील विरार परिसरात दुर्दैवी घटना घडली आहे. येथील प्रसिद्ध अमेय क्लासिक क्लबच्या स्विमिंग पूलमध्ये एका 4 वर्षांच्या चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे, तर पालकांनी क्लब व्यवस्थापन आणि लाइफगार्डवर गंभीर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.
मृत मुलगा ध्रुव सिंह
या घटनेत मृत झालेल्या मुलाची ओळख ध्रुव सिंह अशी झाली आहे. केवळ 3 वर्षे 10 महिन्यांचा हा निष्पाप मुलगा आईसोबत क्लबमध्ये पोहण्यासाठी आला होता. परंतु काही क्षणातच आनंदाचे ठिकाण शोकस्थानात बदलले.
पालकांचा आरोप
ध्रुवच्या आईने दु:खभरल्या आवाजात सांगितले की, “मी वारंवार सांगत होते माझं लेकरू दिसत नाहीये. पण जर मी ते बोललेच नसते, तर त्यांनी माझं मूल शोधायलाही सुरुवात केली नसती. क्लबमध्ये मोठा CCTV कॅमेरा, वॉचमन, ट्रेनर, गार्ड सगळे आहेत… मग माझं लेकरू बुडत असताना हे सगळे कुठे होते?”
हेही वाचा – बाजारात मिळतेय बनावट लसूण; खाल्ली तर पोट, लिव्हर आणि किडनीला फटका!
“माझ्या मुलाच्या तोंडातून फेस येत होता…”
आईने सांगितले की, “ट्रेनरला सेफ्टीसाठी ठेवतात ना, पण त्याने म्हणलं होतं, ‘मी इतरांना बुडवेन पण स्वतः नाही बुडणार.’ जर त्याने एक मिनिट माझ्या मुलाला तपासलं असतं तर कदाचित माझं लेकरू आज जिवंत असतं. माझं लेकरू बाहेर काढलं तेव्हा त्याच्या तोंडातून फेस येत होता… पण क्लबमधल्या कुणालाही सहानुभूती नव्हती.”
पोलीस तपास सुरु
या घटनेनंतर बोलिंज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा (Accidental Death) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की प्राथमिक चौकशी सुरु आहे आणि निष्काळजीपणा सिद्ध झाल्यास संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला जाईल.
समाजातून हळहळ व्यक्त
विरार परिसरात या घटनेने खळबळ उडाली आहे. चिमुकल्याच्या मृत्यूने स्थानिक नागरिक, पालक आणि सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. क्लबकडून अद्याप अधिकृत निवेदन आलेले नाही.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा