

Ireland Maiden Test Win | आयर्लंडसाठी 1 मार्चचा दिवस त्यांच्या क्रिकेट इतिहासात अतिशय संस्मरणीय ठरला. आयरिश संघाने अबू धाबी येथील मैदानावर अफगाणिस्तान विरुद्ध एक सामन्याची कसोटी मालिका 6 गडी राखून जिंकली, ज्यामध्ये कर्णधार अँड्र्यू बालबर्नीने संघाला लक्ष्याचा पाठलाग करण्यात आणि विजय मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आयर्लंडचा कसोटी क्रिकेटमधला हा पहिलाच विजय आहे, याआधी आयर्लंड 7 कसोटी सामने खेळला आहे आणि त्या सर्व सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात आयर्लंडसमोर विजयासाठी 111 धावांचे लक्ष्य होते. आयर्लंड हा जागतिक क्रिकेटमधील पहिला संघ बनला आहे, ज्याच्या महिला संघाने पुरुष संघापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये विजयाची नोंद केली आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना आयरिश संघाने एकवेळ 13 धावा होईपर्यंत 3 विकेट गमावल्या होत्या. इथून कर्णधार अँड्र्यू बालबिर्नीने एका टोकापासून डाव सांभाळत प्रथम पॉल स्टर्लिंगसोबत चौथ्या विकेटसाठी 26 धावांची भागीदारी केली आणि त्यानंतर लॉर्कन टकरसोबत पाचव्या विकेटसाठी 72 धावांची मॅचविनिंग भागीदारी करत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून परतला. आयरिश कर्णधाराने या डावात 96 चेंडूत नाबाद 58 धावा केल्या. आयर्लंड संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग नाही, म्हणूनच बहुतेक प्रसंगी तो फक्त 1 सामन्यांची कसोटी मालिका खेळू शकतो, आतापर्यंत संघाने एकदाच श्रीलंकेविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली आहे.
हेही वाचा – टी-20 वर्ल्डकपबाबत मोठी बातमी..! ‘या’ तारखेला भारतीय संघाची घोषणा
या सामन्यात आयर्लंड संघाच्या गोलंदाजांची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली, ज्यात वेगवान गोलंदाज मार्क अडायरने पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या आणि दुसऱ्या डावातही तो 3 बळी घेण्यात यशस्वी ठरला. या सामन्यात अफगाणिस्तान संघाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे दोन्ही डावातील फलंदाजांची अत्यंत खराब कामगिरी. या सामन्यात अफगाणिस्तान संघाला पहिल्या डावात केवळ 155 धावा करता आल्या, तर दुसऱ्या डावात 218 धावांपर्यंत मजल मारता आली.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!