

Ajinkya Rahane To Play In County Championship : भारतीय संघाबाहेर असलेला उपकर्णधार अजिंक्य रहाणे पुढील वर्षी काऊंटी क्रिकेटमध्ये सहभागी होताना दिसणार आहे. रहाणे येथे लीसेस्टरशायरसाठी मैदानात चमकेल. भारतीय संघासाठी त्याने या वर्षी अखेरचे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळले होते. ब्रिटीश दैनिक ब्रॉडशीट वृत्तपत्र ‘द डेली टेलीग्राफ’ मध्ये दिलेल्या वृत्तानुसार, रहाणे २०२३ च्या काऊंटी हंगामात लीसेस्टरशायरकडून खेळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
लीसेस्टरशायरचा मागचा हंगाम खराब
अजिंक्य रहाणेला लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे. रहाणेला करारबद्ध केल्याने लीसेस्टरशायरच्या संघाला बळ मिळू शकते. लीसेस्टरशायरसाठी २०२२ काउंटी हंगाम चांगला ठरला नाही. १४ सामन्यांत त्यांना एकही सामना जिंकला आला नाही. इतकेच नाही तर हा संघ डिव्हिजन २ मध्ये शेवटच्या स्थानावर होता.
हेही वाचा – IND Vs NED : रोहित शर्मानं रचला इतिहास..! ‘सिक्सर किंग’ युवराज सिंगला सोडलं मागे
This is a great signing for @leicsccc! @ajinkyarahane88 will be brilliant in the #CountyChampionship 🙌🏽🦊 https://t.co/vEOVfZPqzG
— Nikesh Rughani (@NikeshRughani) October 25, 2022
रहाणेला भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याची मोठी संधी आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी त्याला उपकर्णधारपदावरून हटवण्यात आले होते. रहाणेने १४० कसोटी डावात एकूण ४९३१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एकूण १२ शतके झळकली आहेत. त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या १८८ धावा आहे. कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू चेतेश्वर पुजाराला पुन्हा एकदा काऊंटीच्या २०२३ हंगामासाठी ससेक्सकडून करार मिळाला आहे. त्याने यावर्षी काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये १०९ च्या सरासरीने १००० हून अधिक धावा केल्या आहेत.