Video : मारले सलग 8 षटकार! 11 चेंडूंत फिफ्टी ठोकून केला विश्वविक्रम! सर्वत्र आकाश कुमारची चर्चा

WhatsApp Group

Akash Kumar World Record : रणजी ट्रॉफीच्या प्लेट गटातील सामन्यात मेघालयचा खेळाडू आकाश कुमार याने अविश्वसनीय कामगिरी करून सर्वांना चकित केले आहे. अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने सलग 8 षटकार ठोकत आणि फक्त 11 चेंडूंवर अर्धशतक झळकवत विश्वविक्रम केला.  

कोचचा आदेश

या अनोख्या कामगिरीमागे मेघालय संघाचे प्रशिक्षक म्हणजेच कोच यांचा थेट हात होता. कोचने आकाशला मैदानात उतरण्यापूर्वी “आक्रमकपणे खेळ” असा स्पष्ट संदेश दिला होता. आकाश 8व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला, आणि कोचच्या आदेशाचे पालन करत मैदानात हाहाकार उडवला.

 एका इनिंगमध्ये आठ षटकारांचा विक्रम

आकाश कुमार रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील दुसरा खेळाडू ठरला ज्याने एका षटकात सलग सहा षटकार ठोकले. पण एवढ्यावर तो थांबला नाही, पुढील चेंडूंवरही आक्रमण कायम ठेवत त्याने सलग 8 षटकार मारून नवा विक्रम प्रस्थापित केला.

प्रशिक्षकांनी आकाशला जलद खेळण्याचा आदेश दिला त्यामागे एक रणनीती होती. मेघालयचा संघ 600+ धावा करून आपली डाव घोषित करू इच्छित होता, जेणेकरून अरुणाचल प्रदेशला लवकर फलंदाजीस बोलावता येईल. त्यामुळे संघाचा स्कोर जलदगतीने वाढवण्यासाठी आकाशला ‘फुल अटॅक मोड’मध्ये खेळण्याची मुभा दिली गेली.

हेही वाचा – IPL 2026 Auction आधी मोठा बदल! चेन्नई सुपर किंग्जकडून हे 5 खेळाडू होऊ शकतात ‘रिलीज’, पाहा यादी

आकाशची तडाखेबाज फलंदाजी आणि सामन्याचा निकाल

आकाशने आपल्या प्रशिक्षकांचा आदेश अचूकपणे पाळला आणि संघासाठी धडाकेबाज खेळी केली. त्याच्या इनिंगमुळे मेघालयने 6 विकेट्सवर 628 धावा करत डाव घोषित केला. अरुणाचल प्रदेशचा संघ पहिल्या डावात केवळ 73 धावांवर गारद झाला.

या सामन्यानंतर क्रिकेट विश्वात आकाश कुमारचे नाव एका झटक्यात प्रसिद्ध झाले आहे. एकीकडे त्याच्या आक्रमक फलंदाजीची चर्चा होत आहे, तर दुसरीकडे प्रशिक्षकाच्या रणनीतीचे कौतुकही केले जात आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment