

Asia Cup 2023 Final IND vs SL : कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या महामुकाबल्यात भारताने श्रीलंकेचा 10 गड्यांनी दारुण पराभव केला आहे. या विजयासह भारत 2018 नंतर आशियाचा चॅम्पियन संघ ठरला. आशिया कपचे हे भारताचे आठवे विजेतेपद आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेला भारताने जास्त वेळ टिकू दिले नाही. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने 6 विकेट्स काढत लंकेचे कंबरडे मोडले. श्रीलंकाचा आख्खा संघ फक्त 50 धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात भारताकडून इशान किशन आणि शुबमन गिल या सलामी जोडीनेच हे आव्हान 6.1 षटकात पूर्ण केले. इशानने नाबाद 23 तर शुबमनने नाबाद 27 धावा केल्या.
श्रीलंकेचा डाव
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात कुसल परेराचा (0) अडथळा दूर केला. त्यानंतर मोहम्मद सिराजचे तुफान घोंगावले. त्याने एकाच षटकात पाथुम निसांका (2), सदीरा समरविक्रमा (0), चारिथ असलंका (0), धनंजया डी सिल्वा (4) यांना माघाडी धाडले. त्यानंतर सिराजने श्रीलंकेचा कप्तान दासुन शनाकाची (0) दांडी गुल केली. श्रीलंकेचा सलामीवीर कुसल मेंडिसलाही (17) सिराजने 12व्या षटकात बोल्ड केले. हार्दिक पांड्याने दुनिथ वेललागेला (8) बाद करत लंकेला आठवा हादरा दिला. प्रमोद मदुशन (1), मथीशा पाथिराना (0) यांनाही हार्दिकने बाद करत लंकेचा डाव 15.2 षटकात 50 धावांवर संपुष्टात आणला. भारताकडून मोहम्मद सिराजने 21 धावांत 6 विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्याने 3 धावांत 3 विकेट्स आपल्या नावावर केला.
हेही वाचा – IND vs SL Final : जोशात असलेल्या सिराजचा ‘तो’ प्रकार पाहून विराट हसू लागला! पाहा VIDEO
दोन्ही संघांची Playing 11
भारत – रोहित शर्मा (कप्तान), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
श्रीलंका – पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस(विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका(कप्तान), दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथीशा पाथिराना.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!