Asia Cup 2023 : आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान महामुकाबला रंगणार ‘या’ दिवशी!

WhatsApp Group

Asia Cup 2023 IND vs PAK : आशिया चषक 2023 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 2 सप्टेंबर रोजी कँडी, श्रीलंकेत होणार आहे. वेळापत्रकाच्या नवीनतम अपडेटनुसार, यजमान पाकिस्तान 30 ऑगस्ट रोजी स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात नेपाळशी लढणार आहे. जर पाकिस्तान आणि भारत दोघेही सुपर फोर फेरीत पोहोचले तर ते 10 सप्टेंबर रोजी कॅंडीमध्ये पुन्हा खेळतील.

क्रिकइन्फो या वेबसाइटने याबाबत वृत्त दिले आहे. आशियाई क्रिकेट परिषद (ACC) 30 ऑगस्टपासून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेला सुरुवात करत आहे. त्याचबरोबर या स्पर्धेतील पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतान येथे होणार आहे. आणि फायनल 17 सप्टेंबरला कोलंबोमध्ये होणार आहे.

या स्पर्धेचे अंतिम वेळापत्रक अद्याप एसीसीने जाहीर केलेले नाही. त्याच वेळी, या स्पर्धेचे मूळ प्रारूप वेळापत्रक पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) तयार केले आहे. या स्पर्धेसाठी नुकतेच हायब्रीड मॉडेलला मान्यता देण्यात आली. त्यामुळे पाकिस्तान, श्रीलंका, भारत, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान येथे खेळल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.

हेही वाचा – Vaishno Devi : माता वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी मोठी बातमी, दर्शनासाठी जाणाऱ्यांनी एकदा वाचाच!

आशिया चषकाचा फॉरमॅट

या स्पर्धेत एकूण 13 सामने खेळले जातील, या सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होतील. भारत आणि नेपाळसह पाकिस्तान अ गटात तर ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर फोर फेरीसाठी पात्र ठरतील आणि या फेरीतील अव्वल दोन संघ अंतिम फेरीत प्रवेश करतील. आशिया चषक, यावेळी 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल. नेपाळ व्यतिरिक्त, इतर संघांनाही भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी तयारी करण्याची संधी मिळेल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment