

Asian Games 2023 Neha Thakur : एशियन गेम्स 2023 मध्ये भारताला मंगळवारी 12वे पदक मिळाले. नेहा ठाकूरने सेलिंगमध्ये रौप्यपदक जिंकले. चीनमध्ये खेळल्या जाणार्या या स्पर्धेत भारताला आतापर्यंत 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 6 कांस्य पदके मिळाली आहेत. सेलिंगमध्ये हे भारताचे पहिले पदक आहे. यापूर्वी सोमवारी 6 पदके जिंकली होती. भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला आणि सुवर्णपदक जिंकले. अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव केला. दरम्यान, भारताच्या पुरुष संघाने 4×100 मीटर मेडले रिलेमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे.
भोपाळच्या नॅशनल सेलिंग स्कूलची नवोदित खेळाडू नेहा ठाकूर 32 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिली. तिचा नेट स्कोअर 27 गुण होता, तिने थायलंडच्या सुवर्णपदक विजेत्या नोपसॉर्न खुनबुंजनला मागे टाकले. कांस्यपदक सिंगापूरच्या कियारा मेरी कार्लीला मिळाले, जिचा नेट स्कोअर 28 होता. सेलिंगमध्ये, एकूण धावसंख्येमधून खेळाडूंचा सर्वात वाईट स्कोअर वजा करून नेट स्कोअर काढला जातो. डिंगी ILCA-4 ही एकूण 11 शर्यतींची स्पर्धा होती. यामध्ये नेहाने एकूण 32 गुण मिळवले. नेहाला या शर्यतीत 5 गुण मिळाले. एकूण 32 गुणांमधून हे 5 गुण वजा केल्यास तिचा नेट स्कोअर 27 झाला.
हेही वाचा – Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचा भाव!
भारतीय पुरुषांच्या 4×100 मीटर मेडले रिलेमध्ये श्रीहरी नटराज, लिखित सेल्वाराज, साजन प्रकाश आणि तनिश जॉर्ज मॅथ्यू यांच्या चौकडीने 3:40.84 सेकंदांची वेळ नोंदवली आणि हीटमध्ये जपाननंतर दुसरे स्थान पटकावले. त्यांनी जकार्ता येथे 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नटराज, संदीप सेजवाल, प्रकाश आणि आरोन डिसोझा यांचा 3:44.94 चा विक्रम मोडला. भारतीय संघ एकूण चौथ्या स्थानावर राहिला. आज फायनलही होणार आहे.
भारताची शिवांगी शर्मा महिलांच्या 100 मीटर फ्रीस्टाइल प्रकारात 17 व्या स्थानावर राहिली आणि तिला अंतिम फेरी गाठता आली नाही. पलक जोशी महिलांच्या 200 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये 19 जलतरणपटूंमध्ये 14व्या स्थानावर राहिली.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!