AUS vs ENG : फिल्डिंग असावी तर अशी..! हवेत डाय टाकत वाचवला SIX; पाहा Video

WhatsApp Group

AUS vs ENG 1ST ODI : इंग्लंडने चमकदार कामगिरी करत २०२२ च्या टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते. अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानी संघाचा पाच गडी राखून पराभव केला. आता विश्वविजेता बनल्यानंतर इंग्लिश संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत व्यस्त झाला आहे. यात १७ नोव्हेंबर रोजी दोन्ही देशांदरम्यान तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. अॅडलेड ओव्हलवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडू अॅश्टन एगरने चांगलीच चर्चा रंगवली.

खरं तर, मॅचदरम्यान अॅश्टन एगरने अशी फिल्डिंग केली, की पाहून तुम्ही थक्क व्हाल. अॅश्टनने या अप्रतिम क्षेत्ररक्षणाद्वारे आपल्या संघाच्या पाच धावा वाचवल्या. ही संपूर्ण घटना डावाच्या ४५व्या षटकात घडली. पॅट कमिन्सने टाकलेल्या त्या षटकातील शेवटचा चेंडू मलानला डीप-मिडविकेटवर षटकार ठोकायचा होता. हा षटकारही जाईल, असेच वाटत होते. पण सीमारेषेच्या बाहेर हवेत सूर मारत अॅश्टन एगरने चेंडू पकडला आणि नंतर पडण्याच्या काही क्षण आधी चेंडू बाहेर फेकला. एगरच्या क्षेत्ररक्षणाचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. यासोबतच त्याचे मंत्रमुग्ध क्षेत्ररक्षण पाहून चाहतेही हैराण झाले आहेत.

हेही वाचा – Shraddha Murder Case : डेटिंग अॅपवर मैत्री, २० गर्लफ्रेंड आणि रुमवर कांड..! ‘अय्याश’ आफताबची कहाणी

ऑस्ट्रेलियाने जिंकला सामना

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने ४६.५ षटकांत ४ गडी गमावत २९१ धावा करत सामना जिंकला. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ८६ आणि ट्रॅव्हिस हेडने ६९ धावा केल्या. त्याचवेळी स्टीव्ह स्मिथ ८० धावांवर नाबाद परतला. दोन्ही देशांमधला दुसरा वनडे सामना १९ नोव्हेंबरला सिडनीत खेळवला जाणार आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment