रेकॉर्डब्रेक चेस करताना पाकिस्तान अपयशी, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय!

WhatsApp Group

AUS vs PAK World Cup 2023 In Marathi : वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने आपली गती पकडली आहे. चिन्नास्वामीत रंगलेल्या रंगतदार सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 62 धावांनी पराभूत केले. टॉस जिंकून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी घेतली. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांच्या वादळामुळे ऑस्ट्रेलियाने 367 धावांचा डोंगर उभा केला. यापैकी 259 धावा वॉर्नर-मार्श जोडीने कुटल्या. आकाराने लहान असलेल्या आणि फलंदाजीला एकदम मस्त असलेल्या खेळपट्टीवर वॉर्नर-मार्श तुफान खेळले. वॉर्नरने दीडशतकी तर मार्शने शतकी खेळी केली. या दोघांचे रौद्ररुप पाहून ऑस्ट्रेलिया 400 धावा काढणार असे वाटत असताना पाकिस्तानने कमबॅक केले. शाहिद आफ्रिदीने ऑस्ट्रेलियाच्या अर्ध्या विकेट्स घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाला थांबवले. प्रत्त्युत्तरात पाकिस्तानने कडवा प्रतिकार केला. पण त्यांना 305 धावांपर्यंत पोहोचता आले. दीडशतक केलेल्या वॉर्नरला सामनावीर पुरस्कार मिळाला. ऑस्ट्रेलिया आता गुणतालिकेत चौथ्या तर पाकिस्तान पाचव्या क्रमांकावर आहे.

ऑस्ट्रेलिया 367-9 (AUS vs PAK World Cup 2023)

डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श या सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची तुफानी सुरुवात केली. शाहिन आफ्रिदीने टाकलेल्या पाचव्या षटकात वॉर्नर आऊट झाला असता, पण मिड ऑनला उभ्या असलेल्या उसामा मीरने त्याचा सोपा झेल सोडला. याचा फायदा वॉर्नरने पुरेपूर उठवला. वॉर्नर आणि मार्श यांनी पहिल्या गड्यासाठी 259 धावांची विक्रमी भागीदारी रचली. 34व्या षटकात मार्श बाद झाला. मार्शने 10 चौकार आणि 9 षटकारांसह 121 धावांची खेळी केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथ (7), ग्लेन मॅक्सवेल (0), जोस इंग्लिस (13) यांना स्वस्तात गमावले. शेवटच्या षटकात पाकिस्तानकडून शाहिद आफ्रिदीने ऑस्ट्रेलियाच्या शेपटाकडच्या फलंदाजांना गुंडाळले. त्याने 54 धावांत 5 विकेट्स घेतल्या हारिस रौफने 3 विकेट्स घेतल्या, पण त्याला 83 धाववा खर्च कराव्या लागल्या.

हेही वाचा – VIDEO : 14 चौकार, 9 षटकार…पाकिस्तानविरुद्ध डेव्हिड वॉर्नर ‘झुकेगा नहीं साला’!

पाकिस्तानकडून प्रतिकार (AUS vs PAK)

अब्दुल्ला शफीक आणि इमाम उल हक यांनी पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. शफीकने 7 चौकार आणि 2 षटकारांसह 64 धावा केल्या. इमामने 10 चौकारांसह 70 धावा केल्या. मार्कस स्टॉइनिसने दोघांना बाद केले. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी 134 धावा केल्या. बाबर आझम (18) पुन्हा अपयशी ठरला. मोहम्मद रिझवान आणि इफ्तिकार अहमद यांनी फटकेबाजी करत सामन्यात रंगत निर्माण केली, पण अॅडम झाम्पाने सामना फिरवला. त्याने बाबर, रिझवान, इफ्तिकार आणि मोहम्मद नवाझ यांना बाद केले. रिझवानने 46 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून झाम्पाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर पॅट कमिन्स आणि स्टॉइनिस यांना 2-2 विकेट्स मिळाल्या.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment