

Ban On Hitting Sixes : रस्त्यावरील क्रिकेटमध्ये षटकार मारण्यावर बंदी असल्याबद्दल तुम्ही ऐकले असेलच, पण आता इंग्लिश क्लबनेही सिक्सर मारण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. साउथविक आणि शोरेहॅम क्रिकेट क्लबने फलंदाजांना षटकार मारण्यास बंदी घातली आहे. मैदानाजवळ राहणाऱ्या लोकांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या तक्रारींमुळे ही बंदी घालण्यात आली आहे. आता सामन्यात क्लबच्या बाजूने षटकार मारणाऱ्या फलंदाजाला बाद घोषित केले जाईल.
साउथविक आणि शोरहॅम क्रिकेट क्लबचे खजिनदार मार्क ब्रॉक्सअप यांनी षटकारांवर बंदी घालण्याच्या नियमाची माहिती दिली आहे. विम्याचे दावे आणि कायदेशीर कारवाईमुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी त्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. षटकारांमुळे स्टेडियमजवळ राहणाऱ्या लोकांच्या वाहनांचे आणि घराच्या मालमत्तेचे नुकसान झाले. याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून, नुकसान टाळण्यासाठी क्लबने हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – बजेटनंतर सोनं, चांदी, प्लॅटिनम स्वस्त! जाणून घ्या किंमत किती कमी होईल…
ब्रॉक्सअप म्हणाले, “पूर्वीचे क्रिकेट अतिशय शांत वातावरणात खेळले जायचे पण टी-20 आणि वनडेच्या आगमनानंतर या खेळात आक्रमकता दिसू लागली आहे. त्यामुळे स्टेडियमजवळ राहणाऱ्या लोकांच्या मालमत्तेचे नुकसान होऊ लागले आहे. एका 80 वर्षीय व्यक्तीने सांगितले की, आजच्या फलंदाजांचा मोठे फटके मारण्याचा उत्साह वाढला आहे, त्यामुळे स्टेडियम लहान होऊ लागले आहे.”
क्रिकेट क्लबच्या नव्या नियमानंतर आता पहिला षटकार मारल्यानंतर फलंदाजाला इशारा मिळणार आहे. षटकार मारल्यावर फलंदाजाला एकही धाव दिली जाणार नाही. चेतावणी मिळाल्यानंतरही जर फलंदाजाने षटकार मारला तर त्याला बाद घोषित केले जाईल. क्लबने हा नियम लागू केल्याने फलंदाज नाराज आहेत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!